lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावरचे पिंपल्स, काळे डाग लपविण्यासाठी बघा कसा करायचा मेकअप- चेहरा दिसेल एकदम स्वच्छ- सुंदर

चेहऱ्यावरचे पिंपल्स, काळे डाग लपविण्यासाठी बघा कसा करायचा मेकअप- चेहरा दिसेल एकदम स्वच्छ- सुंदर

Right Way To Hide Pimples And Acne Using Makeup: मेकअपद्वारे चेहऱ्यावरचे पिंपल्स, काळे डाग किंवा मग पिंपल्स येऊन गेल्यानंतर चेहऱ्यावर दिसणारे लालसर डाग झाकून टाकणं सहज शक्य आहे. त्यासाठी लक्षात ठेवा ४ सोप्या ट्रिक्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2024 11:27 AM2024-03-12T11:27:36+5:302024-03-12T11:28:23+5:30

Right Way To Hide Pimples And Acne Using Makeup: मेकअपद्वारे चेहऱ्यावरचे पिंपल्स, काळे डाग किंवा मग पिंपल्स येऊन गेल्यानंतर चेहऱ्यावर दिसणारे लालसर डाग झाकून टाकणं सहज शक्य आहे. त्यासाठी लक्षात ठेवा ४ सोप्या ट्रिक्स...

Makeup tips for hiding pimples, acne in makeup, How to do makeup for hiding pimples and acne, right way to hide pimples and acne using makeup  | चेहऱ्यावरचे पिंपल्स, काळे डाग लपविण्यासाठी बघा कसा करायचा मेकअप- चेहरा दिसेल एकदम स्वच्छ- सुंदर

चेहऱ्यावरचे पिंपल्स, काळे डाग लपविण्यासाठी बघा कसा करायचा मेकअप- चेहरा दिसेल एकदम स्वच्छ- सुंदर

Highlights ४ स्टेप तुम्ही केल्या की तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स, काळे डाग दिसेनासे होतील. 

चेहऱ्यावर पिंपल्स येणं ही समस्या खूप जणींना छळते. ज्यावेळी काही कार्यक्रम असेल आणि आपल्याला छान तयार होऊन सुंदर दिसायचं असेल, तेव्हा ते चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि त्यांचे लालसर- काळे डाग पाहून खूप वैताग येतो. मेकअप केला तरी चेहऱ्यावरचे डाग किंवा पिंपल्स तसेच दिसतात आणि त्यामुळे मग आपला लूक सगळाच बिघडतो (right way to hide pimples and acne using makeup). असं झालं की आपला पार मूडऑफ होतो. असं होऊ द्यायचं नसेल तर मेकअप करताना या ४ गोष्टी फक्त लक्षात ठेवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे डाग, पिंपल्स सगळेच व्यवस्थित झाकले जातील आणि मेकअप केल्यानंतर चेहरा अगदी स्वच्छ- नितळ, सुंदर दिसेल. (How to do makeup for hiding pimples and acne)

 

पिंपल्स काळे डाग लपविण्यासाठी कसा करायचा मेकअप

चेहऱ्यावरचे पिंपल्स किंवा इतर कोणतेही काळपट, तांबूस डाग जर चेहऱ्यावर दिसू द्यायचे नसतील तर कशा पद्धतीने मेकअप करावा, याविषयीचा व्हिडिओ urmilanimbalkar या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

नीता अंबानींनी नेसली सुंदर बनारसी जंगला साडी! साडीचा हा कोणता प्रकार- काय त्याची खासियत?

१. यासाठी सगळ्यात आधी तर मेकअपला सुरुवात केली आणि बेसिक मॉईश्चरायझर लावून घेतलं की चेहऱ्यावर जिथे डाग किंवा पिंपल्स असतील तिथे कलर करेक्टर लावा. ते हलक्याशा लालसर अबोली रंगाचं असावं.

 

२. कलर करेक्टर पुर्णपणे वाळला की मग तो पफ घेऊन सेटिंग पावडरने सेट करायचा. 

३. यानंतर तुमच्या स्किनटोनला मॅचिंग होणारं जे कन्सिलर आहे ते त्यावर लावायचं.

सगळ्या कपड्यांवर एकच सॅण्डल- चप्पल घालता? बघा स्मार्ट लूकसाठी कपड्यांनुसार कसे घालावे फुटवेअर

४. कन्सिलर लावल्यानंतर शेवटची स्टेप म्हणजे ओल्या ब्यूटी ब्लेंडरने ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं. या ४ स्टेप तुम्ही केल्या की तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स, काळे डाग आता दिसेनासे होतील. 

५. यानंतर नेहमीप्रमाणे फाउंडेशन लावून तुमचा पुढचा मेकअप सुरू करा. 

 

Web Title: Makeup tips for hiding pimples, acne in makeup, How to do makeup for hiding pimples and acne, right way to hide pimples and acne using makeup 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.