Join us

सुंदर दिसण्याच्या नादात होऊन बसतं भलतंच, ५ मेकअप चुका केल्याने चांगला चेहरा दिसतो विद्रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2025 15:14 IST

makeup tips, 5 makeup mistakes that can make a good face look ugly : चेहरा आणि त्वचा चांगली ठेवा. पाळा काही नियम. मेकअप करा मात्र लक्षात ठेवा या गोष्टी.

सुंदरतेची व्याख्या प्रत्येकाची वेगळीच. आजकाल विविध ब्यूटी प्रॉडक्ट्स आणि ट्रिटमेंट्स आहेत. त्या केल्यावर चेहरा एकदम खुलून दिसतो. मात्र भरपूर मेकअप, विविध ट्रिटमेंट न करताही सुंदर दिसता येते हे ही तेवढेच खरे. ( makeup tips, 5 makeup mistakes that can make a good face look ugly)काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा आणि रोजच सुंदर दिसा. सुंदर दिसण्यासाठी फक्त रंग- रुप महत्वाचे नसून व्यक्तिमत्व महत्त्वाचे असते. कुठे जात आहेत त्या

जागेची परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार पेहराव करणे फायद्याचे ठरते. व्यवस्थित स्वच्छ आणि नीटनेटके राहणे गरजेचे असते. त्वचेचा पोत जरी आपल्याला ठरवता आला नाही तरी त्वचा सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करु शकतो. त्यासाठी आहारात हिरव्या भाज्या, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्व सी, फळे आणि भरपूर पाणी पिणे या गोष्टींचा समावेश केल्यास त्वचेचे कोलेजन वाढते. रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा उजळते. फेसवॉश न वापरता नैसर्गिक फेस मास्क वापरल्यास, चेहऱ्यावरील विषारी पदार्थ बाहेर पडतात व त्वचा ताजीतवानी राहते. 

काही एकदम बेसिक टिप्स आहेत ज्या लक्षात ठेवा. नक्कीच उपयोगी ठरतील. 

१. आजकाल सेंट, परफ्यूम मारणे एकदम कॉमन आहे. त्याचा वास मात्र लगेच उडून जातो. काहींना खुप घाम येतो त्यामुळे शरीराला दुर्गंध येतो. सेंट मारुनही असे होते कारण सेंट वापरायची जागा चुकते. सेंट मारताना फक्त काखेत न वापरता कोपराजवळील पोकळी, मांड्या आणि पोटऱ्यांमधील पोकळी आणि मानेचा भाग या ठिकाणी सेंट मारावा. त्या ठिकाणी दुर्गंधी सोडणारा बॅक्टेरिया जास्त असतो. 

२. त्वचा कोरडी पडते, त्वचेवर सुरकुत्या येतात असे सगळे जर होत असेल तर त्वचेला आपण अनेकविध क्रिम लावतो. अनेक ट्रिटमेंट्स करतो. मात्र फक्त चांगल्या दर्ज्यांचे मॉइश्चराइझर लावून काम होते. रोज न चुकता लावावे. 

३. पायाची काळजी घेणे राहून जाते त्यामुळे पाय फुटतात. पायालाही मॉइश्चराइझ करायचे आणि वर सॉक्स घालायचे नंतरच झोपायचे. रात्रभरात पायाची त्वचा मऊ होते आणि डेडस्कीन आरामात निघते. आठवड्यातून एकदा असे नक्की करा. 

४. ऑफीसला जाताना किंवा बाहेर जाताना बरेचदा घाईत मेकअप लावत असाल तर तसे करणे टाळा. तोंड धुतल्यावर लगेच त्यावर मेकअप लावल्यामुळे तो फुटतो आणि भडक दिसतो. पुसल्यावर चेहरा आणखी विचित्र दिसतो. त्यामुळे तोंड धुतल्यावर ओल्या त्वचेवर अजिबात मेकअप करु नका. 

५. सगळ्यात महत्वाचे म्हणजे झोपण्याआधी मेकअप व्यवस्थित पुसणे. तो तसाच राहीला तर त्वचेला त्रास होण्याची शक्यता जास्त असते. मेकअप रिमूव्हर वापरा. फक्त पाण्याने धुणे फायद्याचे ठरत नाही.  

टॅग्स :मेकअप टिप्सब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी