हातांची काळजी घेणेही फार गरजेचे असते. त्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. हातांचा वापर आपण सगळ्यात जास्त करतो. अनेकदा घाणीमध्ये हात जातात. (Make your hands soft at home!!! You can do manicure using shampoo.. See the easy method)साफसफाई करतानाही आपण हातांचाच वापर करतो. त्यामुळे हातांची त्वचा जरा कडक होते. सतत भांडी घासल्याने हातांचा मऊपणा निघून जातो आणि हात रखरखीत होतात हे तर आपण सर्वच जाणून आहोत. (Make your hands soft at home!!! You can do manicure using shampoo.. See the easy method)त्यामुळे हातांची काळजी घ्यायलाच हवी.
आजकाल पार्लरमध्ये जायचे म्हणजे खिशाला कात्री लागलीच म्हणून समजा. केस कापण्यासाठी किंवा आयब्रो करण्यासाठी आपल्याकडे पर्याय नाही, ही नाजूक कामे प्रशिक्षित व्यक्तीकडूनच करून घेणे शहाणपणाचे आहे. (Make your hands soft at home!!! You can do manicure using shampoo.. See the easy method)मात्र काही पार्लर ट्रिटमेंट्स आहेत, ज्या प्रचंड महाग आहेत आणि त्या घरी करणेही सोपे आहे. घरगुती फेशीअल वगैरे तर आपण पाहतच असतो. पण घरी मॅनिक्यूअर सारख्या ट्रिटमेंट्ससुद्धा करता येतात. अगदी सोप्या स्टेप्स आहेत. नखेही साफ होतील. हातांचा कोरडेपणा जाईल तसेच हात मऊही होतील.
१. हात स्वच्छ धुऊन घ्या. बोटांची नखे कापून घ्या. जर तुम्हाला लांब नखं ठेवायची असतील तर नाही कापलीत तरी चालेल. हातांना तेल लावा आणि थोड्या वेळासाठी तेल तसेच राहू द्या.
२. एक खोलगट भांडे घ्या. दोन्ही हात व्यवस्थित त्यामध्ये मावतील असे भांडे वापरा. त्या भांड्यामध्ये गरम पाणी ओता. पाणी गरम करण्यासाठी वेगळे भांडे वापरा नाहीतर चटका बसेल.
३. त्या गरम पाण्यामध्ये चमचाभर मीठ आणि बेकिंग सोडा घाला. दोन-दोन चमचे पुरे झाले. त्यामध्ये थोडावेळ हात बुडवून बसा. हाताच्या नखांमध्ये अडकलेली माती निघून जाईल.
४. आता ते खराब पाणी ओता आणि दुसरे कोपट पाणी त्यामध्ये भरा. कोमट पाण्यामध्ये तुम्ही घरी जो वापरता तो शॅम्पू ओता. फेस तयार करून घ्या. त्यामध्ये हात घालून चोळा. थोड्यावेळासाठी हात व्यवस्थित चोळत राहा.
५. बेसन , हळद व दूध असा लेप तयार करा. त्याचा वापर करून हात स्क्रब करा. किमान ५ मिनिटांसाठी तरी स्क्रब करा. नंतर हात धुऊन घ्या आणि चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझर हाताला लाऊन ठेवा. हात मस्त मऊ आणि गोरेपान होतात.