Join us

नारळाच्या पाण्यापासून बनवा फेसमास्क, न्यू इयरच्या पार्टीला जाण्यापूर्वी हा मास्क वापरून पाहा, चेहरा करेल ग्लो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2022 13:10 IST

Face Mask from Coconut Water नारळाचे पाणी शरीरासाठी उपयुक्त तर आहेच, आता त्वचेलाही देईल ग्लो, वापर पाहा, मिळेल तुकतुकीत स्किन

आपल्या आरोग्यासाठी नारळाचे पाणी किती उपयुक्त आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यातील पौष्टिक गुणधर्म शरीराला उपयुक्त गुणधर्म देतात. नारळाचे पाणी फक्त शरीरासाठी नाही तर त्वचेसाठी देखील किफायतशीर आहे. हिवाळ्यात त्वचा कोरडी, निस्तेज आणि काळपट पडू लागते. या समस्येपासून सुटका हवी असल्यास नारळाच्या पाण्यापासून तयार फेसपॅक वापरून पाहा. याने चेहऱ्याला नवीन ग्लो, त्वचा तुकतुकीत होईल.

नारळाच्या पाण्यापासून फेस मास्क बनवायचा कसा पाहा

नारळ पाण्यापासून तयार हा फेस मास्क बनवणे खूप सोपे आहे. एका भांड्यात नारळाचे पाणी घ्या, त्यात गुलाबजल चांगले मिसळा. आता हा मास्क कापसाच्या मदतीने त्वचेवर लावा. जेव्हा मास्क सुकून जाईल. तेव्हा चेहरा थंड पाण्याने धुवा. नंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

तुकतुकीत त्वचा

नारळ पाणी आणि गुलाब पाणी पासून तयार हा फेसमास्क त्वचेला नवी चमक देते. हा मास्क त्वचेला हायड्रेट ठेवते. न्यू इयर पार्टीला जाण्यापूर्वी या मास्कचा वापर करा. चेहरा ग्लो करेल.

पीएच पातळी संतुलित करण्यास मदत

नारळाचे पाणी शरीरातील पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते. आपल्या त्वचेवर काळे डाग, मुरुम काळे डाग जास्त असतील तर हा मास्क दिवसातून दोनदा त्वचेवर लावा. याने चेहऱ्याला नवीन ग्लो मिळेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी