Join us
Daily Top 2Weekly Top 5

भोगीच्या स्नानासाठी 'या' पद्धतीने बनवा तिळाचं उटणं, त्वचा होईल मऊ-चेहऱ्यावर येईल तेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2026 18:54 IST

Makar Sankranti 2026: भोगीच्या दिवशी तिळाचं उटणं तयार करून ते लावूनच स्नान करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे..(sesame face pack for flowing skin)

ठळक मुद्देतिळाचं उटणं हिवाळ्यामुळे रखरखीत झालेल्या त्वचेला मऊपणा देण्याचं काम करतं

संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजेच भोगी (Makar Sankranti 2026). संक्रांतीला जेवढं महत्त्व असतं तेवढंच महत्त्व भोगीला सुद्धा आहे. या दिवशी घरातले सगळेच नाहतात. म्हणजेच डोक्यावरून आंघोळी करतात. तसेच दिवाळीला जसे अभ्यंग स्नानाला उटणे लावले जाते, तसेच भोगीच्या दिवशी आंघोळीसाठी तिळाचं उटणं लावण्याची परंपरा मराठवाड्यात आणि महराष्ट्राच्या काही भागात आहे. तिळामध्ये व्हिटॅमिन ई आणि त्वचेसाठी पोषक ठरणारे इतर काही घटक चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे तिळाचं उटणं हिवाळ्यामुळे रखरखीत झालेल्या त्वचेला मऊपणा देण्याचं काम करतं (how to make sesame ubtan for glowing skin?). हे उटणं कसं तयार करायचं ते पाहूया..(sesame face pack for flowing skin)

 

भाेगीच्या स्नानासाठी तिळाचं उटणं कसं तयार करायचं?

तिळाचं उटणं तयार करण्यासाठी एखादा मिनिट तीळ कढईमध्ये घालून मंद आचेवर भाजून घ्या. यानंतर ते थंड होऊ द्या. तीळ थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला. त्यातच थोडी हळद घाला आणि मिक्सरमधून त्याची बारीक पावडर करून घ्या.

फक्त ३ स्टेप्समध्ये झटपट करा भोगीची पारंपरिक भाजी, चव आणि पौष्टिकता दोन्हीही जपणारी...

तिळाची पावडर एका भांड्यात काढा. त्यामध्ये कच्चं दूध किंवा दही घाला आणि त्याची पेस्ट तयार करून घ्या. तिळाची स्निग्धता आणि तसेच कच्चं दूध किंवा दही यांच्यामध्ये असणारे काही घटक त्वचेला छान पोषण देतात. ही पेस्ट चेहऱ्यावर तसेच बाकी अंगावर लावा. १० मिनिटांनी चेहरा धुूवून टाका. त्वचा छान मऊ झाल्यासारखी जाणवेल.

 

हे उपाय देखील करून पाहा..

वरील पद्धतीमध्ये आपण अगदी पारंपरिक पद्धतीने तिळाचं उटणं तयार केलं. आता त्यामध्ये आपण काही बदलही करू शकतो.

तिळगुळाच्या पोळ्या लाटताना फुटतात, चवदार होत नाहीत? घ्या खमंग खुसखुशीत पोळीची सोपी रेसिपी

जसं की तिळाच्या पावडरमध्ये जर थोडी कॉफी, साखर आणि मध घातला आणि हा लेप त्वचेला लावला तर ते त्वचेसाठी एक उत्तम स्क्रब म्हणून काम करतं. कॉफी आणि साखरेमुळे त्वचा तुकतुकीत, चमकदार होते तर मध आणि तिळामुळे त्वचा कोमल, मऊ होते. त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Make Sesame Ubtan for Bhogi bath: Soft, glowing skin awaits!

Web Summary : Prepare sesame ubtan for Bhogi with roasted sesame seeds, turmeric, and raw milk/yogurt. Apply the paste for soft, glowing skin. You can also add coffee, sugar, and honey for a great skin scrub.
टॅग्स :ब्यूटी टिप्समकर संक्रांतीत्वचेची काळजीहोम रेमेडी