Join us

'या' कारणामुळे चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन वाढतात! बघा उपाय- डाग जाऊन चेहरा उजळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2025 12:34 IST

Main Reasons And Causes For Pigmentation On Skin: पुरेशी काळजी घेतली नाही तर चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन वाढत जातं. ते कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? (how to get rid of pigmented skin?)

ठळक मुद्देचेहऱ्यावर पिगमेंटेशन का येतात? आणि ते येऊ नयेत म्हणून किंवा आलेले पिगमेंटेशन कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहिजे?

वयाचा एक ठराविक टप्पा ओलांडला की बहुतांश महिलांना पिगमेंटेशनचा त्रास सुरू होतो. साधारण तिशीनंतर हा त्रास जास्त दिसू लागतो. पिगमेंटेशन म्हणजे चेहऱ्यावर काळसर डाग येणे. या डागांची वेळीच योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर गाल, नाक, कपाळ या भागावर पिगमेंटेशन वाढत जाते आणि चेहरा दिवसेंदिवस अधिकच खराब दिसू लागतो. म्हणूनच पिगमेंटेशन रोखण्यासाठी वेळीच योग्य ते उपाय करणं गरजेचं आहे (main reasons and causes for pigmentation on skin). आणि योग्य उपाय आपण तेव्हाच करू शकतो, जेव्हा आपल्याला त्यामागचं खरं कारण लक्षात येतं (how to get rid of pigmented skin?). म्हणूनच चेहऱ्यावर पिगमेंटेशन का वाढते आणि ते कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहिजे ते पाहा..(home hacks to reduce pigmentation)

 

चेहऱ्यावर पिगमेंटेशन येण्यामागचं मुख्य कारण काय?

चेहऱ्यावर पिगमेंटेशन का येतात आणि ते येऊ नयेत म्हणून किंवा आलेले पिगमेंटेशन कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहिजे याची माहिती सौंदर्यतज्ज्ञांनी mirror_salon_academy_nashik या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

लवकरच हार्ट ॲटॅक येणार..! हे सांगणारी ५ लक्षणं- दुर्लक्ष नकोच, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या

यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की फक्त उन्हात गेल्यामुळेच पिगमेंटेशनचा त्रास होतो, असा अनेक जणींचा गैरसमज आहे. पण तुम्ही घरात असाल किंवा घराबाहेर उन्हात असाल तरी तुम्हाला पिगमेंटेशनचा त्रास होऊ शकतोच. कारण जेव्हा तुम्ही घराबाहेर जाता तेव्हा सुर्यप्रकाशात असणाऱ्या युव्हीए आणि युव्हीबी किरणांमुळे पिगमेंटेशन होतात. तसेच जेव्हा तुम्ही घरात असता तेव्हा खिडकीतून, दरवाजातून जो सुर्यप्रकाश घरात येतो त्यातही युव्हीए किरण असतातच. तसेच लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल यांच्या स्क्रिनमधून येणारा निळसर प्रकाशही पिगमेंटेशन वाढवू शकतो. 

 

पिगमेंटेशन कमी करण्यासाठी काय करावं?

त्यामुळेच तुम्ही घरात असो किंवा घराबाहेर पडणार असो.. सनस्क्रिन लोशन आठवणीने लावायलाच हवं. फक्त उन्हाळ्यातच सनस्क्रिन लोशनची गरज आहे आणि एरवी पावसाळ्यात, हिवाळ्यात नाही, असंही मुळीच नाही. त्यामुळे कोणताही ऋतू असला तरी सनस्क्रिन लोशन ही त्वचेची गरज आहे.

'ही' लक्षणं दिसताच शरीरातलं Vitamin B12 तातडीने वाढवायला हवं! तब्येत बिघडण्याआधीच सावध व्हा..

याशिवाय आणखी एक घरगुती  उपायही तुम्ही करू शकता. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये भाजलेली हळद घ्या. हळद भाजल्यानंतर तिचा पिवळा रंग जाऊन तो तपकिरी, चॉकलेटी होतो. आता या भाजलेल्या हळदीमध्ये मध घाला आणि हा लेप चेहऱ्याला लावा. ५ ते ७ मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका. आठवड्यातून ५ ते ६ वेळा हा उपाय  केल्यास पिगमेंटेशन कमी होते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी