Hair Care Tips : पावसाळा असो, उन्हाळा असो किंवा मग हिवाळा असो केसांची काळजी कोणत्याही दिवसांमध्ये सारखीच घ्यावी लागते. कारण केसांच्या वेगवेगळ्या समस्या नेहमीच सुरू राहतात. काहींना केसगळतीची समस्या असते, काहींचे केस कोरडे होतात, तर काहींचे केस गुंतलेले राहतात. त्यामुळे सगळ्यांनाच वाटत असतं की, त्यांचे केस नेहमीच घनदाट, काळेभोर, मुलायम आणि चमकदार असावेत. पण सगळंच मनासारखं होत नसतं. कारण दररोज वापरले जाणारे केमिकलयुक्त शाम्पू, जे केसांचं नैसर्गिक पोषण हरवून टाकतात. अशावेळी बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितनं केसांसाठी एक खास हेअरपॅक सांगितलाय. यासंबंधी एक व्हिडीओ माधुरीनं तिच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे.
केस चमकदार, मुलायम आणि दाट करण्यासाठी माधुरीनं सांगितलेला हा उपाय फायदेशीर ठरू शकतो. महत्वाची बाब म्हणजे हा उपाय पुर्णपणे नॅचरल आहे. यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या किचनमध्येच सहज मिळतील.
हेयर मास्क बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी
१ पिकलेलं केळं
२ चमचे दही
१ चमचा मध
हेअरमास्क कसा तयार करावा आणि लावावा?
एका बाऊलमध्ये पिकलेलं केळं बारीक करून पेस्ट बनवा. त्यात दही आणि मध घालून नीट एकजीव करा. हा पेस्ट संपूर्ण केसांवर, खासकरून मुळांपासून टोकांपर्यंत लावा. ३० ते ४० मिनिटे तसेच ठेवून द्या. नंतर एखाद्या माइल्ड हर्बल शाम्पूने केस धुवा.
या हेयर मास्कचे फायदे
केसांना खोलवर पोषण मिळतं
कोरडे आणि फ्रिझी केस मऊ करतो
केसांमध्ये नैसर्गिक चमक आणतो
केस गळणे कमी करतो
डोक्याची त्वचा मॉइश्चराइज ठेवतो
हा हेयर मास्क आठवड्यातून एकदा वापरल्यास केसांची गुणवत्ता काही आठवड्यांतच सुधारते.