बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कुठेतरी महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचं असतं. किंवा आपल्याघरी काहीतरी कार्यक्रम असतो. पण कामांमध्ये आपण एवढे जास्त अडकून जातो की पार्लरमध्ये जाऊन फेशियल, क्लिनअप असं काही करून घ्यायला वेळच मिळत नाही. सेलिब्रिटी असली म्हणून काय झालं खुद्द माधुरी दीक्षितवर पण कधी कधी अशी वेळ येतेच.. कधी कधी तिचं शेड्यूल एवढं टाईट असतं की स्वत:वर ब्यूटी ट्रिटमेंट्स करून घ्यायला तिलाही वेळ मिळत नाही (Madhuri Dixit shared her secret remedy for glowing skin). मग अशावेळी चेहऱ्याव झटपट ग्लो आणायचा असेल तर ती काय करते (beauty tips shared by Madhuri Dixit)याविषयीचा तिचा एक खास नुस्का तिने स्वत:च सोशल मीडियावर शेअर केला आहे. बघा यामध्ये ती नेमकं काय सांगत आहे..(how to get young glowing skin like Madhuri Dixit?)
चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो येण्यासाठी माधुरी दीक्षित सांगतेय सोपा उपाय
डल, निस्तेज झालेल्या त्वचेला अगदी चुटकीसरशी एकदम फ्रेश आणि चमकदार कसं करायचं याविषयी माहिती सांगणारा माधुरी दीक्षितचा व्हिडिओ anupriyaa_srivastavaa या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
खूप आंबट झालेलं दही खाल्लं जात नाही? ४ चवदार पदार्थ करून खा- घ्या सोप्या रेसिपी
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त २ पदार्थ लागणार आहेत. त्यापैकी पहिला पदार्थ आहे काकडी आणि दुसरा पदार्थ आहे कच्चं दूध.
सगळ्यात आधी तर काकडीच्या अगदी पातळ गोलाकार फोडी करून घ्या. त्यानंतर एका वाटीमध्ये कच्चं दूध घ्या आणि त्या दुधामध्ये काकडीच्या फोडी भिजत घाला. ही वाटी १५ ते २० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.
हिरव्याकंच कैरीचा करा आंबट- गोड चटपटीत मेथांबा! चवीत बदल होऊन जेवणात येईल रंगत
दूध आणि काकडीच्या फोडी थंडगार झाल्यानंतर त्या फ्रिजमधून बाहेर काढा आणि फोडी चेहऱ्यावर ठेवा. १० ते १२ मिनिटांनी काकडीच्या फोडी चेहऱ्यावरून काढून टाका आणि चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये खूप छान फरक दिसून येईल.