Join us  

लांबसडक निमुळती नाजूक नखंही जोरदार पंच मारतात; बघा अमेरिकन डिफेन्स एक्सपर्टचा व्हायरल व्हिडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2021 11:45 AM

स्वसंरक्षण तर कराच, तेही ट्रेंडी नखं लावून हे सांगत या प्रशिक्षकानं पोस्ट केलेला व्हिडियो होतोय व्हायरल...

ठळक मुद्देशिका मोठ्या नखांचा वापर करुन वेगवेगळ्या प्रकारचे पंच कसे मारायचे काही तासात हा व्हिडियो कित्येक लाख जणांनी पाहिलानखांचा कसा फायदा होतो हे सांगणारेही दोन व्हिडियो अपलोड केले

स्वसंरक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असून प्रत्येकाला त्यातल्या ट्रीक्स आणि टूप्स माहित असायला हव्यात. सध्या तुम्ही धोकादायक परिस्थितीत स्वत:चे संरक्षण कसे करावे याबाबत प्रशिक्षण देणारे बरेच क्लासेसही उपलब्ध आहेत. याबरोबरच इंटरनेटमुळेही सध्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती अगदी सहज उपलब्ध होते. यावर संरक्षणाविषयी माहिती देणारेही व्हिडियो असतात, असाच एक व्हिडियो नुकताच व्हायरल झाला असून तो आपल्यासाठी अतिशय उपयुक्त ठरु शकतो. अमेरिकेतील सेल्फ डिफेन्सचा प्रशिक्षक असलेला रॉबीन खोटी नखं किंवा अँक्रेलिक लावून एखाद्याला कसा पॉवरफूल पंच मारु शकता हे दाखवत आहे. 

ज्या महिलांना वेगवेगळ्या आकाराची आणि रंगाचीं नखे आवडतात त्यांच्यासाठी सध्या बाजारात खोट्या किंवा अँक्रेलिकच्या नंखांचे बरेच प्रकार पाहायला मिळतात. विविध प्रकारची नक्षी असलेली ही नखे महिलावर्गामध्ये प्रसिद्ध आहेत. या व्हिडियोमध्ये रॉबीन याच मोठ्या नखांचा वापर करुन वेगवेगळ्या प्रकारचे पंच कसे मारायचे आणि त्यामुळे तुम्ही स्वत:चे कसे संरक्षण करु शकता याबद्दल सांगत आहे. इन्स्टाग्रामवर या व्हिडियोला नेटीझन्सनी त्याला तुफान प्रतिसाद दिला आहे. काही तासात हा व्हिडियो कित्येक लाख जणांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. याबरोबरच या प्रशिक्षकाने आपले बांधलेले हात सोडवायचे असतील तय या अनोख्या नखांचा कसा फायदा होतो हे सांगणारेही दोन व्हिडियो अपलोड केले आहेत. या पद्धतीने डिफेन्स करायचे ३ दिवस ३ व्हिडियो अपलोड करुन रॉबीनने अतिशय सोप्या युक्त्या सांगितल्या आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्राम