आजकाल महिलांची लाईफस्टाईल अशी आहे की त्या त्यांची स्वत:ची काळजी अजिबात घेत नाहीत. खासकरून केसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष कररतात. आपले केस लांबसडक, सुंदर असावेत असं प्रत्येक महिलेला वाटतं पण त्या केसांकडे फारसं लक्ष देत नाहीत. काही सोपे उपाय करून तुम्ही केसांची लांबी वाढवू शकता. (Long Hairs Home Remedies with Coconut And Kalaunji Oil)
हे तेल कसे तयार करावे?
सगळ्यात आधी नारळाच्या तेलात कलौंजीचं तेल मिक्स करून घ्या नंतर यात कांद्याचा रस मिसळा. कमीत कमी ३० मिनिटं तेल व्यवस्थित शिजू द्या. जेव्हा तेल शिजून व्यवस्थित तयार होईल तेव्हा थंड करून घ्या. तेल थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीत भरून घ्या. हे तेल तुम्ही कमीत कमी १ महिना साठवून ठेवू शकता. आठवड्यातून २ वेळा हे होममेड तेल केसांना लावून मसाज केल्यानं महिन्याभरात केसांमध्ये चांगला परिणाम दिसून येईल.
हे होममेड तेल केसांना कसे लावावे?
सगळ्यात आधी तुम्हाला ३ स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. आधी शॅम्पू घ्या आणि व्यवस्थित केस धुवून घ्या. शॅम्पूनं केस धुतल्यानंतर केसांना कंडीशनर किंवा केमिकल बेस्ड शॅम्पू लावण्याची काहीच गरज नाही. नारळ तेल आणि कलौंजीच्या तेलाचे हे मिश्रण केसांच्या मुळांना लावून कमीत कमी १० मिनिटं स्काल्पची मसाज करा. नंतर टॉवेल गरम पाण्यात बुडवून मग व्यवस्थित पिळून ५ मिनिटांसाठी केस बांधून ठेवा. असं केल्यानं केसांची मुळं चांगली राहतील.
नारळाचे तेल केसांसाठी सगळ्यात बेसिक आणि परिणामकारक उपायांपैकी आहे. हे तेल केसांना खोलवर पोषण देते . केस जर खूपच फ्रिजी, कोरडे झाले असतील तर या तेलाशिवाय उत्तम उपाय कोणताही नसू शकतो. नारळाच्या तेलानं आठवड्यातून २ वेळा मसाज करणं आवश्यक आहे. कलौंजीचं तेल केसांच्या वाढीसाठी उत्तम मानले जाते. ज्यामुळे केस गळती कमी होते. जर तुमचे केस पातळ असतील हे तेल लावल्यानं केस दाट होतील, केसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल.
