लहानपणी आई म्हणायची केस सोडून फिरु नकोस. केस मोकळे दिसले रे दिसले की लगेच वेणी बांधून टाकायची. आपल्याला वेगवेगळ्या ब्रॅण्डचे शाम्पू फार आकर्षक वाटायचे पण आई म्हणायची, ते काही नकोच, शिकाकाई वापर रिठा वापर पण तेव्हा तिच्या या सल्ल्याचा आणि उपदेशांचा राग यायचा. आता त्याचे महत्व कळत आहे. डोक्यावर केस कमी आणि कोंडा जास्त आहे. (Long hair but bald in front, does your forehead look big? See the reasons)ही फक्त तुमची आमची समस्या नाही जगभरातल्या महिला व पुरुष केस गळण्याच्या समस्येने पिडीत आहेत. अनेकांचे केस दिवसेंदिवस कमी होत चाल्ले आहेत तसेच विरळही होत आहेत. काहींना टाळूपाशी टक्कल आहे तर काहींना कपाळावर. पण घरगुती उपाय, चांगल्या सवयी योग्य आहार या बदलांमुळे केसांचे आरोग्य सुधारू शकते.
काही महिलांना समोरच्या बाजूने टक्कल पडायला लागते. ते पटकन दिसूनही येते आणि महिलांना त्यामुळे चिंताही वाटायला लागते. समोरुन असे टक्कल पडण्यामागे नक्की कारणे काय आहेत ते जाणून घ्या.
१. मानेवर केस असलेले अनेकांना आवडत नाही. सैल केस सोडून फिरणाऱ्यांना महिला टोमणेही मारतात मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की सतत घट्ट बांधल्याने केस तुटतात. (Long hair but bald in front, does your forehead look big? See the reasons)मागे सरकतात आणि समोरुन विरळ होतात. केस जरा सैलसरच बांधावेत. उकडते, गरम होते सगळं मान्य आहे मात्र अगदी घट्ट केस बांधल्याने किंवा उलटा सुलटा आंबाडा बांधल्याने केस गळतात. तसेच काही मुलींना सतत नवीन हेअर स्टाईल करायला आवडते. दिसायला जरी सुंदर दिसली तरी सतत उकरणे वापरल्याने केस गळतात तसेच ताणले जातात. त्यामुळे समोरुन विरळ होतात.
२. थायरॉईडचा काही त्रास असेल तरी समोरचे केस कमी होतात. तसेच लोह, व्हिटॅमिन 'डी', बायोटिन यांसारख्या पोषकतत्त्वांची कमतरता असल्याने केस विरळ होतात. तणाव आणि काही औषधोपचारांमुळेही समोरचे केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. योग्य वेळीच डॉक्टरांकडे जाणे गरजेचे असते. केस काय गळतातच असे म्हणून चालत नाही.
३. फ्रंटल फायब्रोसिंग अलोपेसिया ही एक ऑटोइम्यून स्थिती आहे, ज्यामध्ये टाळूच्या पुढील आणि बाजूच्या भागातील केस गळतात. ही समस्या विशेषतः ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये आढळते, पुरुषांमध्येही दिसते. मात्र ५० शीच्या आधीच जर ही समस्या उद्भवली तरी तरी समोरुन टक्कल पडायला लागते.