Join us

लिव्हरचा काही आजार असल्याने तर गळत नाहीत तुमचे केस? ‘ही’ एक चूक पडू शकते महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:26 IST

Hairfall : आजकाल महिलांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या खूप वाढली आहे. जर लिव्हर ठीक नसेल तर केस गळतात. लिव्हरसंबंधी एक चूक तुमच्या केसांचं नुकसान करू शकते. 

Hairfall : केसगळती महिला आणि पुरूषांना होणारी एक गंभीर समस्या आहे. अलिकडे तर ही समस्या इतकी वाढली की, कमी वयातच केस गळू लागतात. ज्यामुळे एकतर केस विरळ होतात किंवा टक्कल दिसू लागतं. केसगळतीची कारणं वेगवेगळी असतात. पण आजकाल एक सगळ्यात जास्त आढळणारं कारण म्हणजे फॅटी लिव्हर. आता तुम्ही म्हणाल की, लिव्हरची समस्या आणि केसगळतीचा काय संबंध? तर नक्कीच आहे. आजकाल महिलांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या खूप वाढली आहे. जर लिव्हर ठीक नसेल तर केस गळतात. लिव्हरसंबंधी एक चूक तुमच्या केसांचं नुकसान करू शकते. 

लिव्हरसंबंधी 'ही' चूक टाळा

लिव्हरसंबंधी ज्या चुकीबाबत आम्ही तुम्हाला सांगतोय ती दुसरी काही नसून लिव्हर डिटॉक्स न करणं आहे. जर तुम्ही लिव्हर साफ करत नसाल तर केसगळतीसोबत इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आता तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की, लिव्हर कसं साफ करायचं? तर लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही काही हेल्दी सवयी लावू शकता आणि काही गोष्टींचा आहारात समावेश करू शकता.

इन्स्टाग्रामवरील फेमस कन्टेन्ट क्रिएटर ईशा लाल यानी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी लिव्हर आतून साफ करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. ईशा सांगतात की, लिव्हरचं आरोग्य जर चांगलं नसेल तर तुमच्या केसांचं मोठं नुकसान होऊ शकतं. अशात तुम्ही किचनमधील काही आयुर्वेदिक गोष्टींच्या मदतीनं लिव्हर डिटॉक्स करू शकता म्हणजे लिव्हरमध्ये जमा विषारी तत्व बाहेर काढू शकता. यानं केसांना आतून पोषण मिळू शकतं.

काय खावं-प्यावं?

लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी हळद, आवळा आणि बडीशेप या गोष्टी फायदेशीर ठरतात. यांचं प्रमाण गरजेनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला केसांचं आरोग्य सुधारायचं असेल आणि लिव्हर डिटॉक्स करायचं असेल तर एक खास ड्रिंक तुम्ही घरीच तयार करू शकता. चला जाणून घेऊ त्याची रेसिपी..

१ चमचा हळद पावडर, १ मोठा चमचा आवळ्याचं पावडर, १ चमचा बडीशेप, २ कप गरम पाणी आणि एक चमचा मध घ्या. हे तयार करण्यासाठी दोन कप पाणी उकडून घ्या आणि त्यात आवळ्याचं पावडर आणि बडीशेप टाका. हे टाकल्यावर पाणी आणखी ५ ते ७ मिनिटं उकडू द्या. नंतर गॅस बंद करा आणि हळद टाका. या गोष्टी चांगला मिक्स करा. हे ड्रिंक थोडं थंड झाल्यावर गाळून घ्या. हे ड्रिंक तुम्ही कोमट असताना एक एक घोट पिऊ शकता. यात तुम्ही वरून हवं असेल तर थोडं मध टाकू शकता.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स