Join us

ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 16:15 IST

काही लोक ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप ऑइल वापरतात तर काही लिप बाम लावतात. पण या दोघांपैकी कोणता चांगला पर्याय आहे? हे जाणून घेऊया...

ओठ कोरडे पडणे ही फक्त हिवाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत एक सामान्य समस्या बनली आहे. बदलत्या हवामानासोबतच, मॉर्डन लाईफस्टाईल, जास्त वेळ एसीमध्ये राहणं आणि कमी पाणी पिणे ही देखील ओठ कोरडे होण्यामागची कारणं आहेत. ओठ कोरडे पडण्यासोबतच ओठ फाटतात. अशा वेळी आपल्या सर्वांच्या ब्युटी किटमध्ये एक गोष्ट निश्चितच असते ती म्हणजे लिप बाम किंवा लिप ऑइल. काही लोक ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप ऑइल वापरतात तर काही लिप बाम लावतात. पण या दोघांपैकी कोणता चांगला पर्याय आहे? हे जाणून घेऊया...

लिप ऑइल आणि लिप बाम दोन्ही ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी वापरले जातात. परंतु त्यांचे फायदे वेगळे आहेत. लिप बाम सहसा वॅक्स बेस असतो, जसं की पेट्रोलियम जेली, जो ओठांवर प्रोटेक्टिव्ह लेयर बनवतो आणि बाह्य कोरडेपणापासून संरक्षण करतो. हिवाळ्यात अधिक वापरलं जातं.

लिप ऑइल हलकं, नॉन स्टिकी आणि हायड्रेटिंग असतं. ते द्रव स्वरूपात येतं, ज्यामध्ये सहसा कोकोनट ऑइल, जोजोबा ऑइल किंवा व्हिटॅमिन ई सारखे घटक असतात, जे ओठांना आतून ओलावा देतात. विशेष म्हणजे लिप ऑइलचा टेक्सचर हलकं असतं, म्हणून ते मेकअपवर देखील सहजपणे लावता येते.

लिप ऑइल आणि लिप बामचे फायदे

लिप बाम विशेषतः कोरड्या आणि फाटलेल्या ओठांसाठी वापरलं जातं. वॅक्स, शिया बटर, पेट्रोलियम जेली किंवा तूप सारखे जाड मॉइश्चरायझिंग एजंट असतात. ते लावल्याने ओठांना ओलावा मिळतो आणि फाटलेले ओठ हळूहळू बरे होऊन मऊ होऊ लागतात. झोपण्यापूर्वी लिप बाम लावल्याने ओठांना खोलवर ओलावा मिळतो.

लिप ऑइल लावल्यावर चिकट वाटत नाही. त्यात कोकोनट ऑइल, जोजोबा ऑइल, बदाम ऑइल किंवा व्हिटॅमिन ई सारखे घटक असतात, जे केवळ बाहेरूनच नव्हे तर आतूनही ओठांना मऊ आणि मॉइश्चरायझ करतात. ते लावल्याने ओठांना नॅचरल चमक मिळते.

कोणता पर्याय जास्त चांगला?

ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम आणि लिप ऑइल दोन्ही सर्वोत्तम आहेत. परंतु ओठांच्या स्थितीनुसार त्यांचा वापर करणं योग्य आहे. उदाहरणार्थ, जर तुमचे ओठ फाटले असतील तर लिप बाम हा एक चांगला पर्याय आहे. जर ओठांना छान चमक आणि ओलावा हवा असेल तर लिप ऑइल चांगलं आहे.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सओठांची काळजी