Lokmat Sakhi >Beauty > पिंपल्समुळे चेहऱ्याची चमक कमी झाली? चमचाभर 'या' तेलाचा करा वापर, चेहरा चमकेल रोज

पिंपल्समुळे चेहऱ्याची चमक कमी झाली? चमचाभर 'या' तेलाचा करा वापर, चेहरा चमकेल रोज

Let your skin glow with the health benefits of mustard oil : सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा करा असा वापर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2024 10:22 AM2024-05-14T10:22:00+5:302024-05-14T10:25:02+5:30

Let your skin glow with the health benefits of mustard oil : सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा करा असा वापर..

Let your skin glow with the health benefits of mustard oil | पिंपल्समुळे चेहऱ्याची चमक कमी झाली? चमचाभर 'या' तेलाचा करा वापर, चेहरा चमकेल रोज

पिंपल्समुळे चेहऱ्याची चमक कमी झाली? चमचाभर 'या' तेलाचा करा वापर, चेहरा चमकेल रोज

भारतीय खाद्यसंस्कृतीत मोहरीच्या तेलाचा वापर होतो (Beauty Tips). मोहरीचे तेल आरोग्यदायी मानले जाते. आरोग्यासोबत त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर ठरते. बऱ्याच महिलांना पिंपल्सची समस्या असते. शिवाय पिंपल्स आल्यानंतर हे पिंपल्सचे डाग सहसा लवकर निघत नाही. जर आपण देखील मुरूम आणि मुरुमांच्या डागांपासून त्रस्त असाल तर, मोहरीच्या तेलाचा वापर करून पाहा.

मोहरीचे तेल फक्त आरोग्यासाठी फायदेशीर नसून, त्वचेसाठीही उपयुक्त मानले जाते. यात अनेक गुणधर्म असतात. त्यात मुख्य म्हणजे अँटी - फंगल आणि अँटी - बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेवर असणारे रॅशेज यासह मुरुमांचे डाग दूर करण्यास मदत होईल. पण मोहरीच्या तेलाचा वापर मुरुम आणि मुरुमांचे डाग काढण्यासाठी कसा करावा पाहा(Let your skin glow with the health benefits of mustard oil).

उर्फी जावेदसारखा चमचमता ग्लो हवा चेहऱ्यावर? तांदुळाच्या पाण्यात मिसळा 'ही' माती चमचाभर; बघा जादू

मुरुमांवर मोहरीच्या तेलाचा वापर कसा करावा?

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक चमचा कोमट केलेले मोहरीचे तेल घ्या. त्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा कडुनिंबाची पावडर घालून मिक्स करा. तयार मिश्रण मुरूम किंवा मुरुमांच्या डागांवर लावा. रात्रभर तयार पेस्ट डागांवर तशीच ठेवा. सकाळी उठल्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. आपण या पेस्टचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. यामुळे मुरुमांचे डाग नक्कीच जातील.

पायांवर उन्हामुळे चपलांच्या टॅनिंगचे डाग? हातही काळवंडले? २ घरगुती उपाय-पाय चमकतील

त्वचेसाठी मोहरीच्या तेलातील गुणधर्म

- मोहरीचे तेल आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते. त्यात अधिक प्रमाणात व्हिटॅमिन ए, ई आणि बी हे तत्व आढळतात. याचा वापर केल्याने त्वचेवर ग्लो येतो.

- मोहरीच्या तेलात ओमेगा ३ आढळते. ज्यामुळे पिंपल्सचे डाग दूर करण्यास मदत मिळते.

- मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील डाग सहज दूर होण्यास मदत मिळते.

Web Title: Let your skin glow with the health benefits of mustard oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.