Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > वाटीभर साखर आणि लिंबाच्या रसाचे घरगुती वॅक्स! वेदनेशिवाय केस निघतील सहज, त्वचा दिसेल उजळ व मऊमुलायम...

वाटीभर साखर आणि लिंबाच्या रसाचे घरगुती वॅक्स! वेदनेशिवाय केस निघतील सहज, त्वचा दिसेल उजळ व मऊमुलायम...

lemon sugar wax for hair removal : painless waxing at home : homemade waxing for hair removal : घरीच सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून घरगुती वॅक्स कसे तयार करायचे याची भन्नाट ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2026 13:39 IST2026-02-01T13:25:50+5:302026-02-01T13:39:19+5:30

lemon sugar wax for hair removal : painless waxing at home : homemade waxing for hair removal : घरीच सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून घरगुती वॅक्स कसे तयार करायचे याची भन्नाट ट्रिक...

lemon sugar wax for hair removal painless waxing at home homemade waxing for hair removal | वाटीभर साखर आणि लिंबाच्या रसाचे घरगुती वॅक्स! वेदनेशिवाय केस निघतील सहज, त्वचा दिसेल उजळ व मऊमुलायम...

वाटीभर साखर आणि लिंबाच्या रसाचे घरगुती वॅक्स! वेदनेशिवाय केस निघतील सहज, त्वचा दिसेल उजळ व मऊमुलायम...

त्वचेवरील नको असलेले अनावश्यक केस काढण्यासाठी अनेकजणी वेगवेगळे उपाय करतात. केस काढण्यासाठी कुणी वॅक्सिंग करत तर, कुणी रेझर वापरतात. इतकंच नाही तर फारशी वेदना न होता, केस काढण्यासाठी तसेच रेशमी आणि मऊ त्वचा मिळावी म्हणून आपण अनेकदा पार्लरचे महागडे उपाय देखील करतो. पार्लरमधल्या वेदनादायी वॅक्सिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकलमुळे अनेकदा त्वचेवर रॅशेस किंवा लालसरपणा येतो. अशावेळी नैसर्गिक, सोपा आणि कमी खर्चिक घरगुती उपाय म्हणून लिंबाचा रस आणि साखरेपासून तयार होणारा होममेड वॅक्स हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो(lemon sugar wax for hair removal)

लिंबामधील नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म आणि साखरेचे चिकट टेक्स्चर यामुळे हे वॅक्स केस मुळासकट काढण्यास मदत करते, तसेच त्वचा स्वच्छ आणि मऊमुलायम  दिसायला मदत होते. लिंबाचा रस आणि साखर यांचा वापर करून बनवलेले हे 'शुगर वॅक्स' केवळ केस मुळापासून काढत नाही, तर लिंबातील नैसर्गिक (homemade waxing for hair removal) गुणधर्मांमुळे त्वचा उजळण्यासही मदत होते. हे वॅक्स बनवायला अतिशय सोपे, खिशाला परवडणारे आणि केमिकल-मुक्त असल्यामुळे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे. घरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून घरगुती वॅक्स कसे तयार करायचे (painless waxing at home) आणि योग्य पद्धतीने कसे वापरायचे ते पाहूयात.. 

त्वचेवरचे नको असलेले केस काढण्यासाठी घरगुती वॅक्स... 

पद्धत १ :- घरच्याघरीच वॅक्स तयार करण्यासाठी साखर १ कप, लिंबाचा रस १/४ कप, २ टेबलस्पून मध, गरजेनुसार पाणी आणि वॅक्स स्ट्रिप्स इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.

सर्वात आधी एक 'नॉन-स्टिक' पॅन घ्या. त्यामध्ये साखर, लिंबाचा रस आणि मध एकत्र करा. हे मिश्रण मंद आचेवर गरम करायला ठेवा. मिश्रणाला उकळी येईपर्यंत ते शिजवा. मिश्रण शिजवत असताना चमच्याने किंवा पळीने ते सतत ढवळत राहा, जेणेकरून ते पॅनला चिकटणार नाही. जोपर्यंत साखरेचा पाक घट्ट होत नाही, तोपर्यंत हे मिश्रण शिजवा. वॅक्स तयार झाल्यावर ते एका काचेच्या बरणीत किंवा कंटेनरमध्ये काढून घ्या. त्यानंतर हे भांडे बर्फाच्या पाण्यात ठेवून वॅक्स थोडे थंड होऊ द्या. तुमचे घरगुती नैसर्गिक वॅक्स आता वापरण्यासाठी तयार आहे.

मेथीदाणा पाणी केसाला लावलेच नाही कधी? केसांसाठी अमृत-आजीबाईंच्या बटव्यातला घ्या उपाय... 

पद्धत २ :- घरगुती वॅक्स तयार करण्यासाठी आपल्याला साखर २ कप, लिंबाचा रस १/४ कप, पाणी १/४ कप, टी ट्री ऑईल १ ते २ थेंब इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

एका पॅनमध्ये साखर, लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करा. त्यात १ ते २ थेंब टी ट्री ऑईल घाला. हे मिश्रण गॅसवर ठेवून सतत ढवळत राहा. मिश्रणाचा रंग सोनेरी तपकिरी झाल्यावर आणि ते घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. तयार वॅक्स एका काचेच्या बरणीत काढून थंड होऊ द्या.

फक्त २० रुपयांत घरच्याघरीच होईल बॉडी स्क्रबिंग! डेड स्किन, टॅनिंग निघेल मिनिटांत - स्वस्तात मस्त पार्लरसारखे बॉडी स्क्रब... 

तयार वॅक्स वापरण्याची योग्य पद्धत... 

वॅक्स लावण्यापूर्वी तुमची त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडी करा. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल किंवा घाम निघून जाईल. वॅक्स लावण्यापूर्वी ते खूप गरम नाही ना याची खात्री करा. ते कोमट असावे जेणेकरून त्वचा भाजणार नाही. लाकडी स्टिक किंवा चमच्याच्या मदतीने केसांच्या वाढीच्या दिशेने वॅक्सचा एक पातळ थर लावा.

वॅक्स लावलेल्या भागावर वॅक्सिंग स्ट्रिप ठेवा आणि हाताने हलके दाबा. आता एका हाताने त्वचा घट्ट पकडा आणि दुसऱ्या हाताने केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने झटक्यात स्ट्रिप ओढा. वॅक्सिंग पूर्ण झाल्यावर त्वचा ओल्या कापडाने किंवा पाण्याने स्वच्छ पुसून घ्या. वॅक्सिंगनंतर त्वचेवर कोरफड जेल किंवा मॉइश्चरायझर लावा जेणेकरून त्वचेला थंडावा मिळेल.

Web Title : घर पर चीनी वैक्स: दर्द रहित बाल हटाना, चमकदार और मुलायम त्वचा।

Web Summary : घर पर बने चीनी वैक्स से अनचाहे बालों को आसानी से हटाएं। नींबू और चीनी दर्द रहित बाल हटाने और एक्सफोलिएशन प्रदान करते हैं। सरल नुस्खे कठोर रसायनों के बिना चिकनी, चमकदार त्वचा प्रदान करते हैं, जो सभी प्रकार की त्वचा के लिए उपयुक्त हैं।

Web Title : Homemade sugar wax: Painless hair removal, brighter and softer skin.

Web Summary : Remove unwanted hair easily with homemade sugar wax. Lemon and sugar offer painless hair removal and exfoliation. Simple recipes provide smooth, bright skin without harsh chemicals, suitable for all skin types.