उन्हामुळे आपली त्वचा अधिक काळी पडते. या दिवसांत त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते.(Skin care tips) परंतु, ऋतू बदल्यानुसार त्वचेवर त्याचा अधिक परिणाम पाहायला मिळतो.(lemon juice for dark circles) घराबाहेर पडल्यानंतर त्वचा काळी दिसू लागते. अशावेळी नेमक काय करावे सुचत नाही. (home remedy for tanned skin)चेहऱ्यावर सतत घाम येणे आणि टॅनिंगची समस्या ही सामान्य वाटत असली तर त्वचेला हानिकारक ठरते.(skin whitening remedy at home) हा त्रास कमी करण्यासाठी आणि त्वचेचे सौंदर्य पुन्हा एकदा खुलविण्यासाठी सोपा घरगुती उपाय करुन पाहा.(lemon and turmeric face mask) या समस्येवर डॉक्टर प्रियंका त्रिवेदी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले आहे की, चेहऱ्यावर घाम येणे, तेलकट होणे आणि टॅनिंग सारख्या समस्या टाळण्यासाठी काही घरगुती उपाय केल्यास त्वचा चमकण्यास मदत होईल. (remove suntan naturally)
आरोग्यासाठी वरदान आहे कडुनिंबाची पानं! 'असा' करा उपयोग, पुटकुळ्या-फोड्या- कोंडा होईल दूर
चेहरा चमकवण्यासाठी लिंबाचा रस, १ चमचा टोमॅटोचा रस, २ चमचे काकडीचा रस आणि कोरफडीचा गर घ्या. सगळ्यात आधी आपल्याला टोमॅटोच्या रसात काकडीचा रस, कोरफडीचा गर आणि लिंबाचा रस घाला. हे सर्व व्यवस्थित मिक्स करुन संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. टॅन झालेल्या ठिकाणी हा पॅक लावल्याने काळी पडलेली त्वचा चमकण्यास मदत होईल.
ही पेस्ट तयार करुन किमान अर्धा तास त्वचेवर लावावी. यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा. जर ही क्रिया आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास चेहरा उजळण्यास मदत होईल. तसेच ही आपण फ्रेश तयार करुन चेहऱ्यावर लावल्यास जास्त फायदा होईल.
टॅनिंग आणि घाम काढून टाकण्यासाठी हा उपाय केवळ महिलाच नाही तर लहान मुलांसाठी देखील आपण वापरु शकतो. परंतु, चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. हा पॅक संध्याकाळी लावल्यास फायदा होईल. तसेच वापरण्यापूर्वी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा.