बहुतांश महिलांच्या मागे रोजच्या कामांची एवढी धावपळ असते की त्यातून वेळ काढून स्वत:च्या सौंदर्याकडे लक्ष देणं होत नाही. त्वचेची, केसांची पुरेशी काळजी घेता येत नाही. त्यातच धूळ, प्रदुषण, ऊन आहेच. त्याचाही परिणाम त्वचेवर होतो. शिवाय वाढता स्ट्रेस, आहारात झालेला बदल याचाही परिणाम त्वचेवर होतो आणि मग कमी वयातच चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या दिसायला सुरुवात होते. असं झाल्यावर आपण महागडे ॲण्टी एजिंग क्रिम लावायला सुरुवात करतो. पण त्यापेक्षाही खूप प्रभावी असं एक क्रिम घरच्याघरी तयार करता येतं (how to use clove for reducing fine lines and wrinkles?). विशेष म्हणजे हे क्रिम तयार करण्यासाठी आपल्याला अगदी १५ ते २० रुपयांपेक्षा जास्त खर्च येत नाही (anti aging cream using clove). ते क्रिम कसं तयार करायचं ते पाहूया...(lavang or clove cream for youthful skin)
लवंग वापरून ॲण्टीएजिंग क्रिम कसं तयार करायचं?
हे क्रिम तयार करण्यासाठी मोठ्या टपोऱ्या आकाराच्या आणि ज्यांना फुलं आहेत अशा ५ ते ६ लवंग एका काचेच्या डबीमध्ये घ्या. त्यामध्ये १ चमचा ग्लिसरीन, १ चमचा गुलाब पाणी, १ चमचा ॲलोव्हेरा जेल घाला आणि सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.
१ महिन्यात केस गळणं थांबेल, केसांवर शिंपडा 'हे' पिवळं पाणी, काही दिवसांतच केस होतील लांबसडक
आता हे क्रिम १० ते १२ तास तसेच राहू द्या. त्यानंतर तुम्हाला त्या क्रिमचा रंग बदललेला दिसेल. आता हे क्रिम रोज रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. दुसऱ्या दिवशी लगेचच त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल. एकदा तयार केलेले क्रिम ८ ते १० दिवस चांगले टिकते. काही दिवस हे क्रिम नियमितपणे लावून पाहा. त्वचेवरच्या बारीक सुरकुत्या कमी झालेल्या दिसतील.
त्वचेसाठी लवंग वापरण्याचे फायदे
१. लवंगमध्ये असणारे काही घटक त्वचेतला घट्टपणा टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचा सैलसर होत नाही आणि कमी वयात त्वचा सुरकुतत नाही.
काही केलं तरी गाड्यावर मिळते तशी पावभाजी घरी होतच नाही? ३ उपाय- एकदम झकास चव येईल..
२. लवंगमध्ये युजेनॉल हा घटक असतो. त्यामुळे त्वचेवरचे ओपन पोअर्स कमी होण्यास मदत होते.
३. लवंगमध्ये असणारे ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक त्वचेवरचे पिगमेंटेशन, पिंपल्स, ॲक्ने कमी करण्यासाठी मदत करतात.
Web Summary : Make anti-aging cream at home with cloves, glycerin, rose water, and aloe vera. Apply nightly for youthful skin. This cream reduces wrinkles and tightens skin, diminishing pores, pigmentation, and acne. Regular use shows visible improvements.
Web Summary : लौंग, ग्लिसरीन, गुलाब जल और एलोवेरा से घर पर एंटी-एजिंग क्रीम बनाएं। युवा त्वचा के लिए रात को लगाएं। यह क्रीम झुर्रियाँ कम करती है और त्वचा को कसती है, रोमछिद्रों, पिगमेंटेशन और मुंहासों को कम करती है। नियमित उपयोग से दृश्यमान सुधार दिखता है।