Lokmat Sakhi >Beauty > क्रिती सनॉन न चुकता करते ५ गोष्टी, म्हणून दिसते तिची त्वचा कायम फ्रेश आणि तजेलदार...

क्रिती सनॉन न चुकता करते ५ गोष्टी, म्हणून दिसते तिची त्वचा कायम फ्रेश आणि तजेलदार...

Kriti Sanon's easy 5-step morning skincare routine : Kriti Sanon Skincare : Kriti Sanon Morning Skincare Routine : From Ice Dunking To Detoxifying, Kriti Sanon's Morning Skincare Routine Is Refreshing As Ever : कितीही बिझी असली तरी क्रिती सनॉन, फॉलो करते 'या' सवयी - म्हणून तिची त्वचा दिसते कायम फ्रेश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2025 10:59 IST2025-06-14T07:47:24+5:302025-06-14T10:59:35+5:30

Kriti Sanon's easy 5-step morning skincare routine : Kriti Sanon Skincare : Kriti Sanon Morning Skincare Routine : From Ice Dunking To Detoxifying, Kriti Sanon's Morning Skincare Routine Is Refreshing As Ever : कितीही बिझी असली तरी क्रिती सनॉन, फॉलो करते 'या' सवयी - म्हणून तिची त्वचा दिसते कायम फ्रेश...

Kriti Sanon's easy 5-step morning skincare routine Kriti Sanon Skincare Kriti Sanon Morning Skincare Routine | क्रिती सनॉन न चुकता करते ५ गोष्टी, म्हणून दिसते तिची त्वचा कायम फ्रेश आणि तजेलदार...

क्रिती सनॉन न चुकता करते ५ गोष्टी, म्हणून दिसते तिची त्वचा कायम फ्रेश आणि तजेलदार...

'क्रिती सनॉन' (Kriti Sanon) ही बॉलिवूडमधील तिच्या निखळ सौंदर्यासाठी फारच प्रसिद्ध आहे. क्रिती बॉलिवूड मधील फक्त फेमस अभिनेत्रीच नाही तर तिची नैसर्गिक आणि तजेलदार त्वचा देखील नेहमीच (Kriti Sanon's easy 5-step morning skincare routine) चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. तिने अनेकदा (Kriti Sanon Skincare) मुलाखतींमध्ये आणि सोशल मीडियावर तिच्या स्किन केअर सिक्रेट्स (Kriti Sanon Morning Skincare Routine) चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. क्रिती आपले सौंदर्य जपण्यासाठी अनेक घरगुती उपाय करते. ती नेहमीच 'मिनिमल आणि सिम्पल' स्किनकेअर रुटीनवर अधिक भर देते, जे त्वचेला आतून पोषण देणारे असते(From Ice Dunking To Detoxifying, Kriti Sanon's Morning Skincare Routine Is Refreshing As Ever).

क्रिती सनॉन हिचं सौंदर्य आणि तिची नितळ, तेजस्वी त्वचा पाहून अनेकांना वाटतं की ती नक्कीच महागडी स्किनकेअर प्रॉडक्ट्स आणि ट्रीटमेंट्स करत असणार. पण प्रत्यक्षात तिचे मॉर्निंग स्किनकेअर रुटीन अत्यंत साधे, नैसर्गिक आणि आपल्या सारख्या सामान्यांना देखील सहजपणे करता येईल असे आहे. क्रितीच्या स्किनकेअर रुटीनमध्ये, विशेषतः स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहेत  ज्याचा परिणाम कोणत्याही महागड्या स्किनकेअर प्रॉडक्ट्सपेक्षा अधिक दीर्घकाळ टिकणारा व खिशाला परवडणारा असतो. क्रिती सारखी नितळ आणि तेजस्वी त्वचा हवी असेल तर यासाठी क्रिती नेमकं काय काय करते ते पाहा...   

क्रितीचे स्किनकेअर रुटीन.... 

१. दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने :- क्रिती सनॉन दररोज सकाळी लिंबू घालून कोमट पाणी पिते. ते शरीराला आतून स्वच्छ करतेच पण त्वचेला नैसर्गिक चमक देखील देते. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन 'सी' त्वचेची चमक आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि त्वचा निरोगी दिसते.

सांधेदुखी सतावते? दीपिका पदुकोणची न्यूट्रिशनिस्ट सांगते 'स्वस्त' घरगुती उपाय - वेदना होतील कमी...

२. आईस डंकिंग (Ice Dunking) :- तजेलदार, शांत त्वचा मिळवण्यासाठी क्रिती सकाळी बर्फाच्या थंड पाण्यात चेहरा बुडवते. आईस डंकिंग करताना, चेहरा काही सेकंदांसाठी बर्फाच्या पाण्यात बुडवला जातो. ह्या पद्धतीमुळे चेहऱ्यावरची  सूज कमी होते, मसल्स रिलॅक्स होतात आणि ओपन पोर्स बंद होण्यास मदत मिळते. इतकेच नव्हे तर त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि संपूर्ण दिवसाचा थकवा देखील दूर करण्यास उपयुक्त ठरते. 

अथिया शेट्टी केसांना लावते 'हे' घरगुती तेल! म्हणून तिचे केस दिसतात सुंदर - पाहा तिचा देसी उपाय...

३. डिटॉक्स मास्क :- जर क्रितीला शूटिंगसाठी सकाळी लवकर तयार व्हायचे असेल तर ती डिटॉक्सिफायिंग फेसमास्क वापरते. हा फेसमास्क त्वचेला खोलवर स्वच्छ करतो, त्वचेतील अतिरिक्त तेल काढून टाकतो  आणि चेहऱ्याला त्वरित ताजेतवाने करण्यास मदत करतो. बाजारात अनेक नैसर्गिक डिटॉक्स मास्क उपलब्ध आहेत, परंतु तुम्ही घरी मुलतानी माती, गुलाबपाणी आणि हळदीपासून बनवलेला मास्क देखील वापरू शकता. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते  आणि शूटिंग दरम्यान मेकअप देखील त्वचेवर दीर्घकाळ टिकतो.

४. हायड्रेटिंग फेसमास्क :- क्रिती म्हणते की मासिक पाळीच्या आधी किंवा दरम्यान त्वचा अनेकदा कोरडी आणि थकलेली दिसते. अशावेळी ती हायड्रेटिंग फेसमास्क वापरते जेणेकरून त्वचेला आवश्यक ओलावा मिळेल आणि त्वचा कायम मऊमुलायम राहील. हायड्रेटिंग मास्कमध्ये हायलुरोनिक ॲसिड किंवा एलोवेरा जेल सारखे घटक असले पाहिजेत जे त्वचेला खोलवर मॉइश्चराईझ करतात. क्रितीच्या मते, त्या खास दिवसांमध्ये त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

त्वचा ते केस, त्रास काहीही असो तूप ठरते वरदान! चमचाभर तुपाची जादू करा-दिसाल सुंदर कायम...

५. डार्क सर्कल्स :- क्रिती ग्रीन टी आणि कॅफिनपासून बनवलेले आयमास्क डोळ्यांखालील डार्क सर्कल्स आणि पॅचेसवर लावते. १५ मिनिटांसाठी हे मास्क डोळ्यांखाली तसेच ठेवून द्यावेत, यामुळे डोळ्यांखालील सूज, डार्क सर्कल्स आणि थकवा कमी होतो. जर तुम्ही स्क्रीनसमोर बराच वेळ घालवत असाल किंवा पुरेशी झोप घेत नसाल तर हे आयमास्क तुमच्या डोळ्यांना आराम देतील. हे आयमास्क वापरल्याने डोळ्यांना व त्वचेला थंडावा मिळतो.

Web Title: Kriti Sanon's easy 5-step morning skincare routine Kriti Sanon Skincare Kriti Sanon Morning Skincare Routine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.