हिवाळा सुरु झाला की त्वचेच्या अनेक समस्या सुरु होतात. त्वचा कोरडी होणे, निस्तेज होणे किंवा ओपन पोअर्सची समस्या होते.(Masoor dal face mask) त्वचेसाठी आपल्याला क्रीम्स, सिरम, मास्क वापरुनही हवा तसा परिणाम दिसत नाही.(Rice face mask) हिवाळा म्हटलं त्वचेला सतत ड्रायनेसचा सामना करावा लागतो. चेहरा, ओठ, हात-पाय यांची त्वचा पटकन कोरडी पडते, अचानक खाज सुटू लागते. अनेकांना तर त्वचा काळवंडल्यासारखी, निस्तेज आणि रुक्ष दिसते. (Winter skin care tips)
त्वचा सुंदर आणि ग्लोइंग दिसण्यासाठी आपण त्वचेला अनेक प्रकारच्या क्रीम्स लावतो.(Glowing skin tips) इतकंच नाही तर महागडे ब्यूटी प्रोडक्ट्सचा वापर देखील करतो. यात असणारे केमिकल्स घटक त्वचेच अधिक नुकसान करतात.(Home remedies for dry skin) ज्यामुळे त्वचा आणखी कोरडी आणि निस्तेज होते. अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास त्वचेचा तेलकटपणा आणि ड्रायनेस कमी होईल.
थंडीत तुळशीचे रोप राहिल हिरवेगार-टवटवीत! मातीत मिसळा १ गोष्ट, भरगच्च पानांनी बहरेल तुळस
आपल्या तेलकट किंवा ड्रायनेस त्वचेचा त्रास असेल तर तांदूळ, मसूरची डाळ आणि चण्याची डाळ घ्यावी लागेल. या सर्वांची पावडर करुन त्यात केशर घाला. जर आपली त्वचा कोरडी असेल तर कच्च्या दुधात ही पावडर मिसळून चेहऱ्यावर लावा. तेलकट त्वचा असेल तर हा पावडर गुलाब पाण्यात मिसळून लावा.
ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळेल. हे आपल्या त्वचेवर १० ते १५ मिनिटे लावायला हवे. सात दिवस असे रोज केल्यास आपल्याला फरक जाणवू लागेल. कोरिअन स्किन सिक्रेटमध्ये तांदूळ हा घटक मुख्य मानला जातो. याचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने कोरडेपणा, तेलकटपणा, पिग्मेंटेशन, टॅनिंग, लहान पुरळांचे डाग, आणि रफनेसही कमी होतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज होत असेल तर हा मास्क त्वचेच्या आतपर्यंत पोषण पोहोचवतो आणि एकदम नैसर्गिक, फ्रेश, ग्लोइंग लूक देतो.
