Join us  

Korean Skin care: मेकअप वगैरे नाही तर या घरगुती उपयांनी उजळदार दिसतात कोरियन तरूणी; वाचा हे सोपं ब्यूटी सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 5:29 PM

Korean Skin care : बर्‍याच लोकांना असे वाटते की कोरियन मुलींचे सौंदर्य केवळ मेकअपमुळे आहे. पण असं अजिबात नाही. आपली त्वचा निरोगी आणि चमकदार बनविण्यासाठी हे लोक विशिष्ट स्किनकेअर दिनचर्या पाळतात.

ठळक मुद्देतांदळाचे पाणी त्वचेची चमक वाढविण्यासाठी चांगले आहे. याशिवाय कोरडी त्वचा, खुले छिद्र आणि मुरुमांसारख्या समस्यांना टाळण्यासाठी तांदळाचे पाणी फायदेशीर ठरते. बार्लीच्या चहात  मोठ्या प्रमाणावर एंटी ऑक्सिडेंट्स असात. त्यामुळे त्वचा निरोगी आणि हेल्दी राहण्यास मदत होते.

कोरियन महिलांची त्वचा खूपच सुंदर आणि आकर्षक असते. त्यांच्या सुंदर त्वचेप्रमाणेच त्वचा मिळावी असं सगळ्यांनाच वाटत असतं. जगभरात कोरियन ब्यूटी प्रॉडक्टसचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का कोरियन मुली आपल्या त्वचेसाठी महागडी उत्पादनं नाही तर घरगुती साहित्य वापरतात.

बर्‍याच लोकांना असे वाटते की कोरियन मुलींचे सौंदर्य केवळ मेकअपमुळे आहे. पण असं अजिबात नाही. आपली त्वचा निरोगी आणि चमकदार बनविण्यासाठी हे लोक विशिष्ट स्किनकेअर दिनचर्या पाळतात. आज आम्ही आपल्याला त्यांच्या त्वचेच्या सौंदर्याशी निगडित ब्युटी सिक्रेट्स सांगणार आहोत. हे सिक्रेट्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. 

तांदळाचे पाणी

कोरियन मुलींच्या फ्लॉलेस स्‍किनमागे तांदळाच्या पाण्याचा मोठा वाटा आहे.  तुमचा विश्वास बसणार नाही पण सगळ्यात जुन्या ब्यूटी हॅक्सपैकी हा एक उपाय आहे. तांदळाच्या पाण्यात खूप पोषक तत्व असतात  जी त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. हा सगळ्यात सोपा घरगुती उपाय आहे. यासाठी तुम्हाला वेगळा वेळ द्यावा लागणार नाही. यासाठी तुम्हाला फक्त तांदूळ रात्रभर भिजवून ठेवायचा आहे. सकाळी उठल्यानंतर याच पाण्यानं तुम्हाला चेहरा स्वच्छ करायला आहे. 

तांदळाच्या पाण्याचे फायदे

तांदळाचे पाणी त्वचेची चमक वाढविण्यासाठी चांगले आहे. याशिवाय कोरडी त्वचा, खुले छिद्र आणि मुरुमांसारख्या समस्यांना टाळण्यासाठी तांदळाचे पाणी फायदेशीर ठरते. याशिवाय तांदळाचे पाणी मऊ त्वचा राखण्यासाठी वापरले जाऊ शकते.

तोंडाची मसाज

जेव्हा लोकांना कळंल की तोंडाची मसाज केल्यानंतर त्वचा चमकदार होते. त्यावेळी गुआ शा आणि जेड रोलर्स लोकांनी मोठया प्रमाणावर खरेदी करायला सुरूवात केली. त्वचेची मसाज केल्यानं रक्त प्रवाह व्यवस्थित राहतो. त्वचेवर एक वेगळीच चमक येते. योग्य पद्धतीनं मसाज केल्यास एजिंगची लक्षणं कमी होण्यास मदत होते. 

बार्ली टी

बार्लीच्या चहात  मोठ्या प्रमाणावर एंटी ऑक्सिडेंट्स असात. त्यामुळे त्वचा निरोगी आणि हेल्दी राहण्यास मदत होते. कोरियाई लोक आपला चहा म्हणजेच बार्ली टी प्यायला कधीही विसत नाहीत या चहात एंटी ऑक्सिडंट्स, फायबर्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्वचेच्या मृत पेशी जीवंत होण्यास मदत होते. चेहरा टवटवीत, चांगला दिसतो. 

१० सेकंदांचा नियम

कोरियनं ब्युटीअनुसार आपला चेहरा धुतल्यानंतर १० सेकंदाच्या आत टोनर लावायलाच हवं. टोनर लावल्यानं बाहेरच्या हवेपासून त्वचेला  डिडायड्रेड होण्यापासून वाचवता येऊ शकतं. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सआरोग्यमहिला