सध्याच्या जगात प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. काचेसारखी पारदर्शक, डागविरहित आणि नैसर्गिकरित्या चमकणारी त्वचा कोणाला नको असते? पण ही त्वचा मिळवण्यासाठी पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करण्याची किंवा महागडी रसायने वापरण्याची मुळीच गरज नाही.(Korean Glass Skin) कोरियन महिलांच्या सौंदर्याचे सर्वात मोठे गुपित म्हणजे नैसर्गिक घटकांवर असलेले प्रेम. आपल्या स्वयंपाकघरात किंवा छोट्याशा गार्डनमध्ये असे अनेक घटक असतात जे आपल्या त्वचेचं सौंदर्य वाढवतात. त्यातीलच एक कोरफड. (Aloe Vera for skin whitening)कोरफडीचा वापर आपण अनेक वर्षांपासून करत आहोत पण ती लावण्याची योग्य पद्धत माहित नसेल तर आपल्याला हवा तसा रिजल्ट मिळत नाही.(Natural face pack for glass skin) कोरफडीच्या गरासोबत काही घटक मिसळून त्वचेला लावल्यास रातोरात आपल्या त्वचेला ग्लो मिळेल. तसेच कडाक्याच्या उन्हात काळवंडलेली त्वचा असो किंवा डाग हा कोरियन स्किन केअर उपाय केल्यास आपल्याला तेजस्वी लूक मिळेल.(Aloe vera and honey face mask) घरच्या घरी'ग्लास स्किन' मिळवण्याची ही साधी पण प्रभावी पद्धत पाहूया. (Korean beauty hacks Marathi)
कोरियन स्किनकेअरमध्ये त्वचेला हायड्रेट ठेवण्यावर सगळ्यात जास्त भर दिला जातो. कोरफड, गुलाबजल आणि मध या तिन्हींचे मिश्रण त्वचेसाठी अमृतासारखे काम करते. कोरफडमध्ये ९५ टक्के पाणी असते. जे त्वचेला आतून ओलावा देते. यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स आणि डाग कमी करण्यास मदत करतात. गुलाबजल हे नैसर्गिकरित्या टोनर म्हणून काम करते. उन्हाळ्यात त्वचा फ्रेश ठेवण्यासाठी आणि त्वचेची पीएच बॅलेन्स राखण्यासाठी गुलाब जल अत्यंत आवश्यक आहे. तर मध हे मॉइश्चरायझरचे काम करते. हा फेस पॅक कसा तयार करायचा पाहूया.
एका बाऊलमध्ये २ मोठे चमचे ताज्या कोरफडीचा गर घ्या. त्यात १ चमचा गुलाब जल मिक्स करा. आणि नंतर त्यात अर्धा चमचा मध घालून हे मिश्रण चांगले फेटून घ्या. हा फेस पॅक त्वचेवर लावण्यापूर्वी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तयार मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने लावून वरच्या वर मसाज करा. मसाज केल्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि ग्लो येतो. हा पॅक चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे तसाच राहू द्या. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी केल्यास आपल्याला काही दिवसात फरक पाहायला मिळेल. आपण या मिश्रणाचे आइस क्यूब्स ही करुन चेहऱ्यावर चोळू शकतो. यामुळे चेहऱ्यावरील ओपन पोर्स बंद होतील आणि त्वचा अधिक टाईट दिसते. आठवड्यातून किमान तीन वेळा हा उपाय करा.
Web Summary : Get radiant skin overnight with this simple DIY Korean beauty secret! Aloe vera, rose water, and honey create a hydrating face pack. Use regularly for glowing, flawless skin, saving on expensive parlor treatments.
Web Summary : एलोवेरा, गुलाब जल और शहद से रातोंरात पाएं चमकदार त्वचा! यह आसान DIY कोरियन ब्यूटी सीक्रेट है। नियमित उपयोग से पाएं निखरी और बेदाग त्वचा, पार्लर के खर्च से बचें।