Join us

तरुण त्वचेसाठी चिनी- कोरियन मुलींप्रमाणे 'या' गोष्टी करा, ८ दिवसांतच १० वर्षांनी तरुण दिसू लागाल.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2025 12:36 IST

Korean Beauty Secret For Reducing Wrinkles And Fine Lines: चायनामधल्या मुली किंवा कोरियन मुलींच्या तरुण, सुंदर, चमकदार त्वचेचं सिक्रेट काय आहे ते पाहूया..(how to get young looking beautiful skin?)

ठळक मुद्देत्वचेवरील सुरकुत्या तसेच त्वचेचा सैलपणा कमी करून त्वचेची लवचिकता वाढविण्यासाठी कोणते उपाय करावे?

कोरियन ब्यूटी ट्रेण्ड सध्या जगभर गाजतो आहे. कारण त्या लोकांची चमकदार, ग्लास स्किन आता सगळ्या जगालाच भुरळ घालते आहे. ते लोक त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी कोणतीही महागडी ब्यूटी ट्रिटमेंट घेत नाहीत. तर त्यांच्याकडे जे काही सौंदर्योपचार जुन्या काळापासून चालत आलेले आहेत, त्यांचाच आधार घेऊन त्या त्यांचं साैंदर्य सांभाळून ठेवतात. यापैकी तांदळाच्या पाण्याचा उपाय तर आपल्याला माहितीच आहे. पण त्यासोबतच तिथले लोक त्वचेला व्यायाम मिळेल, त्वचेचा घट्टपणा टिकून राहील यासाठी त्वचेला एका ठराविक पद्धतीने व्यायाम देतात (korean beauty secret for reducing wrinkles and fine lines). अगदी २ मिनिटांचे हे व्यायाम आहेत (how to get young looking beautiful skin?). पण जर ते तुम्ही नियमितपणे केले तर मात्र नक्कीच काही दिवसांतच तुम्ही आहात त्यापेक्षा जास्त तरुण दिसू लागाल..(how to maintain tightness of skin?)

 

त्वचेवरील सुरकुत्या, त्वचेचा सैलसरपणा कमी करण्यासाठी उपाय

त्वचेवरील सुरकुत्या तसेच त्वचेचा सैलपणा कमी करून त्वचेची लवचिकता वाढविण्यासाठी कोणते उपाय करावे, याची माहिती faceyoga.eva या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये सांगितलेले २ उपाय पुढीलप्रमाणे

जिभेवर ताबाच नसल्याने सारखं गोड खाता? ५ टिप्स- शुगर क्रेव्हिंग कमी होऊन वजन राहील कंट्रोलमध्ये..

१. सगळ्यात पहिला व्यायाम म्हणजे तुमच्या उजव्या किंवा डाव्या हाताची ३ बोटे दोन्ही भुवयांच्या मधोमध टेकवा आणि त्वचेवर हळूवार दाब देत ते तुमच्या हेअरलाईनपर्यंत वर घ्या. यामुळे कपाळावरच्या तसेच डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

 

२. दोन्ही तळहात एकमेकांवर चोळा आणि हातांनी डोळे बंद करा. त्यानंतर हात डोळ्यांवर फिरवत तिरक्या दिशेने वर नेऊन कानाच्या वर घ्या. यामुळे डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या तर कमी होतातच, पण डोळ्यांभोवती आलेली सूज किंवा सॅगिंग आय ही समस्या कमी होते.

काचेच्या बांगड्या खूप लवकर टिचतात? १ सोपी ट्रिक- महिनोंमहिने बांगड्या फुटणार नाहीत

३. यानंतर दोन्ही तळहात हनुवटीवर ठेवा आणि जॉ लाईनच्या दिशेने वर घ्या. यामुळे ओठांच्या आजुबाजुच्या सुरकुत्या कमी होऊन त्वचा लोंबल्यासारखी दिसत नाही. जॉ लाईन परफेक्ट होऊन चेहऱ्याला चांगला आकार येतो आणि डबल चीनची समस्याही कमी होते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीव्यायाम