कामाच्या गडबडीत, बदलेल्या जीवनशैलीमुळे आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. (Skin care tips) त्वचा आपल्या चेहऱ्याचे सौंदर्याने सांगते. आपली त्वचा सुंदर, नितळ आणि चांगली दिसावी असं सगळ्यांना वाटतं. (anti-wrinkle home remedy) त्वचा सुंदर दिसण्यासाठी आपण महागडे उत्पादने आणि केमिकल्स लावतो. परंतु, याचा आपल्या त्वचेवर चुकीचा परिणाम होतो. (home remedy for clean skin)
त्वचेची काळजी घेतली नाही की, पिंपल्स, डाग, सुरकुत्या आणि ओपन पोअर्स, डोळ्यांखाली काळी वर्तुळे वाढतात.(natural face cleanser at home) ज्यामुळे कमी वयात देखील चेहरा खराब, म्हातारा दिसू लागतो. दिवसभर प्रदूषण, धुळीचा सामना केल्यानंतर चेहऱ्यावर घाणीचा काळा थर जमा होतो. (glowing skin hacks at home) हा थर काढण्यासाठी आपला चेहरा धुणे खूप महत्त्वाचे आहे. चेहरा धुतला नाही तर त्वचेवर घाण साचते. आपल्या त्वचेचे छिद्र स्वच्छ करण्यासाठी आपण स्वयंपाकघरातील ३ पदार्थांनी त्वचा स्वच्छ करु शकतो. ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येईल. (remove pimples naturally)
वय पंचविस पण दिसताय चाळिशीच्या, ओपन पोर्समुळे चेहरा खराब? १ सोपी ट्रिक, महिनाभरात दिसेल फरक
1. चेहऱ्यासाठी दूध सगळ्यात जास्त फायदेशीर मानले जाते. यामुळे त्वचा स्वच्छ, मऊ आणि चमकदार राहते. दुधात लॅक्टिक ॲसिड असते. जे त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. यामुळे त्वचा नैसर्गिक एक्सफोलिएशन होते. याचा मदतीने त्वचा खोलवर स्वच्छ होते. यासाठी सगळ्यात आधी त्वचा पाण्याने स्वच्छ करावी. आपण कच्चे किंवा उकळलेले दूध वापरु शकता. दुधात अनेक प्रकारचे निरोगी चरबी आणि प्रथिने असतात. जे त्वचेला आवश्यक पोषण देतात. २ मिनिटे दूध चेहऱ्यावर लावून स्वच्छ पाण्याने धुवा.
2. मधामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म चेहरा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. ते त्वचेला नैसर्गिक चमक देते आणि मुरुमे कमी करतात. इतकेच नाही तर त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करुन त्वचेचा कोरडेपणा दूर करता येतो. चेहऱ्यावर २ मिनिटे मध लावून ठेवा. नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसण्यास मदत होईल.
3. मुलतानी माती ही त्वचा खोलवर स्वच्छ करण्यास मदत करते. तसेच त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाण काढून टाकते, त्वचेवरील छिद्र घट्ट करते. यात असणारे खनिजे त्वचेला थंड करतात. मुरुमे, टॅनिंग, डाग कमी करण्यास मदत करतात. याचा फेस पॅक चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल.