नुकतीच आई झालेली कियारा अडवाणी बॉलिवूडमधील फेमस अभिनेत्री. कियारा तिच्या अभिनयासोबतच फिटनेस आणि सौंदर्याकडे देखील तितक्याच बारकाईने लक्ष देते. अनेक बॉलिवूड अभिनेत्री (Kiara Advani’s face mask for glowing skin) आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या (Kiara Advani beauty tips) महागड्या ट्रिटमेंट्स तसेच ब्यूटी प्रॉडक्स्टचा वापर सर्रास करतात. परंतु बॉलिवूड मधील अशा काही मोजक्याच ( Kiara Advani reveals her skin care routine secrets) अभिनेत्री आहेत ज्या आर्टिफिशियल उपाय करण्याऐवजी नैसर्गिक आणि पारंपरिक, घरगुती उपायांना प्राधान्य देतात, कियारा देखील त्यापैकीच एक(Kiara Advani revealed her go-to skincare routine).
कियाराच्या चमकदार आणि हेल्दी त्वचेचं सिक्रेट महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये नसून, एका खास घरगुती उपायांमध्ये दडलेलं आहे. तिच्या आवडत्या ब्यूटी सिक्रेट्सपैकी एक म्हणजे तिचा स्पेशल, घरगुती फेसमास्क, जो त्वचेला नवीन फ्रेशनेस देतो, त्वचा कोमल ठेवतो आणि डेड स्किन काढून टाकतो. कियारा अडवाणीचा (Kiara Advani) हा ब्यूटी मास्क कसा तयार करायचा आणि त्याचे त्वचेला होणारे फायदे नेमके काय आहेत ते पाहूयात...
कियाराच्या स्किन ब्यूटी सिक्रेट्समधील खास उपाय...
कियारा अडवाणी तिच्या चेहऱ्यावर घरगुती, पारंपरिक बेसनचा फेसपॅक लावते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी १ टेबलस्पून बेसन, ३ ते ४ टेबलस्पून दूध, १ टेबलस्पून साय आणि १ टेबलस्पून मध इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
तिचा हा सिक्रेट फेसमास्क कसा तयार करायचा ?
कियाराचा आवडता घरगुती सिक्रेट फेसमास्क तयार करण्यासाठी सर्वातआधी एका बाऊलमध्ये, बेसन, दूध, साय आणि मध असे सगळे घटक कालवून एकजीव करुन घ्यावे. कियाराचा सिक्रेट घरगुती फेसमास्क वापरण्यासाठी तयार आहे.
याचा वापर कसा करावा ?
हा तयार फेसपॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटं लावून ठेवावा. नंतर पाण्याने धुवून चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. यामुळे त्वचेवरील घाण निघून जाते तसेच डेड स्किन देखील सहज काढली जाते. याचबरोबर, त्वचेचा नॅचरल ग्लो वाढतो, शिवाय चेहरा अधिक उजळ दिसतो.
महागडं तेल केसांना चोपडताय? जावेद हबीब सांगतात, केसांसाठी योग्य तेल कोणतं-लावायचं कसं..
पिंपल्स येऊ नयेत म्हणून तमन्ना भाटिया चेहऱ्याला रोज लावते एक विचित्र गोष्ट, पण डॉक्टर म्हणतात..
हा फेसमास्क वापरण्याचे फायदे...
१. बेसन :- बेसन त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकते आणि त्वचेचा नैसर्गिक रंग उजळवते.
२. दूध :- दूध त्वचेला पोषण देते आणि यामुळे त्वचेला नैसर्गिक मऊपणा येतो.
३. मध :- मध त्वचेला नैसर्गिक ओलावा देते आणि मधातील जंतुनाशक गुणधर्मामुळे त्वचा खोलवर स्वच्छ केली जाते.
४. दुधावरील साय :- दुधावरील ताजी साय कोरडी व निस्तेज त्वचा मऊ व तजेलदार बनवते.