Join us

Skin Care With Kesar: पिंपल्स आणि डाग होतील गायब - चेहरा होईल स्वच्छ, केशराच्या काडीची पाहा जादू..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2022 14:42 IST

How To Use Saffron for Skin: पिंपल्स आणि त्यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग (pimples and acne) कमी करायचे असतील तर केशराच्या काडीची जादू एकदा बघाच..(skin care tips)

ठळक मुद्देहे टोनर तुम्ही काचेच्या बाटलीमध्ये भरून फ्रिजमध्ये ७ ते ८ दिवस स्टोअर करून ठेवू शकता. 

सुकामेव्यातला सगळ्यात महागडा पदार्थ जर कोणता असेल तर तो म्हणजे केशर. अतिशय महागडं असणारं केशर अगदी तोळ्या- तोळ्यानेच खरेदी करावं लागतं. केशर एवढं महागडं का असतं, यामागे अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे त्याच्यात असणारे गुणधर्म. एखाद्या पदार्थाची चव वाढविण्यासाठी केशर जेवढं महत्त्वाचं ठरतं, तेवढंच ते आरोग्यासाठीही पोषक असतं. म्हणूनच तर अशा या बहुगुणी केशराचा उपयोग तुमच्या त्वचेसाठी करा. चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि काळे डाग काढून टाकण्यासाठी त्याची नक्कीच मदत होते. (how to reduce pimples)

 

हा उपाय इन्स्टाग्रामच्या beautifulyoutips या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये केशर आणि अन्य काही पदार्थ वापरून केशर मिल्क टोनर तयार करण्यात आलं आहे. नियमित लावल्यास ७ दिवसांतच खूपच चांगला परिणाम दिसून येईल, असं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवा आणि त्यानंतर चेहऱ्यावर केशर मिल्क टोनर लावा. टोनर लावल्यानंतर धुळीत जाणं टाळा.

 

कसं तयार करायचं केशर टोनर? (kesar milk toner)- केशर टोनर तयार करण्यासाठी आपल्याला केशराच्या ३ ते ४ काड्या, चिमुटभर हळद, एक टीस्पून कोरफड जेल, २ टीस्पून रोझ वॉटर आणि १० टीस्पून दूध लागणार आहे.- सुरुवातीला केशर, हळद आणि कोरफडीचा गर एका बाऊलमध्ये टाका आणि व्यवस्थित हलवून एकत्रित करून घ्या.- नंतर त्यात रोझ वॉटर टाका.- सगळ्यात शेवटी हळूहळू दूध टाका. दूध आणि बाकीचं मिश्रण एकजीव करून घ्या.- केशर मिल्क टोनर झालं तयार.- हे टोनर तुम्ही काचेच्या बाटलीमध्ये भरून फ्रिजमध्ये ७ ते ८ दिवस स्टोअर करून ठेवू शकता. 

 

केशर मिल्क टोनर लावण्याचे फायदे (benefits of applying kesar milk toner)- पिंपल्स कमी होतात.- काळे डाग निघून जाण्यास मदत होते.- त्वचेचा पोत सुधारून त्वचा चमकदार दिसू लागते.- केशरामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेचे पोषण होते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी