Join us
Daily Top 2Weekly Top 5

कतरिना कैफच्या नॅचरल ग्लोचं 'यलो सिक्रेट'! रोज १ चमचा खा- त्वचा होईल गुलाबासारखी ग्लो, सुरकुत्याही होतील कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2026 13:02 IST

Katrina Kaif skincare secret : natural glow for skin: celebrity beauty secrets:सुंदर, निरोगी त्वचेसाठी महागडे सप्लिमेंट्स खरोखरच गरजेचे आहे का?

बॉलिवूडच्या सुंदरी कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांच्या सौंदर्याची चर्चा जगभर आहे. वयाची चाळीशी जवळ आली तरी त्यांची त्वचा एखाद्या विशीतल्या तरुणीसारखी टवटवीत आणि घट्ट दिसते.(Katrina Kaif skincare secret) अनेकदा आपल्याला वाटतं की, या अभिनेत्री केवळ महागड्या ट्रिटमेंट्स आणि कॉस्मेटिक्सवर अवलंबून असतात. (natural glow for skin)त्यांची त्वचा नेहमीच तेजस्वी, तजेलदार आणि नैसर्गिक दिसते.(celebrity beauty secrets) वय वाढत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचा लवलेश दिसत नाही. महागड्या ट्रीटमेंट्स किंवा फिल्टर्सपेक्षा त्या एका साध्या घरगुती गोष्टीवर कायम विश्वास ठेवतात. हल्ली वाढत्या वयात त्वचा तरुण ठेवण्यासाठी अनेकजण विविध कोलेजन सप्लिमेंट्स घेतात. बाजारात मिळणारे महागडे पावडर, कॅप्सूल आणि पेय प्यायल्याने त्वचा चमकण्यास मदत होते. कोलेजन संबंधित मिळणारी उत्पादने सोशल मीडियावर देखील सहज मिळतात. पण सुंदर, निरोगी त्वचेसाठी महागडे सप्लिमेंट्स खरोखरच गरजेचे आहे का? 

टक्कल पडलेल्या जागी केस उगवतील नव्याने; १० रुपयांचा घरगुती उपाय, वयाच्या पन्नाशीतही केस लांबसडक-घनदाट, वाढतील भरपूर

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांची न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह म्हणते, त्वचेची सुंदरता ही आतून येते. आपण योग्य आहार, नैसर्गिक उपाय केल्यास शरीरात कोलेजन स्वत:च तयार होते. न्यूट्रिशनिस्ट म्हणते शरीराला आतून स्वत:ची त्वचा दुरुस्त करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे फक्त ३ ते ४ आठवड्यात आपल्याला लगेच बदल पाहायला मिळणार नाही. पण दीड ते २ महिन्यात आपल्याला फरक दिसतो. या काळात आपण कोलेजन सप्लिमेंट्स घेण्याची आवश्यकता नाहीये. 

श्वेता शाह म्हणते की जर एक चमचा तूप एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून ८ ते ९ आठवडे रोज सकाळी सेवन केल्याने शरीर स्वत:च नैसर्गिकरित्या कोलेजन तयार करते. तूप हा आपल्या स्वयंपाकघरातील सगळ्यात महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. तुपात चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्त्व असतात. ज्यात अ, ड, ई आणि के असतात. ज्यामुळे त्वचा हाडे आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असतात. इतकंच नाही तर हार्मोनल संतुलन आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. 

तूप हे केवळ आरोग्यासाठीच नाही, तर नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणूनही काम करतं. आपण ज्यावेळी नियमितपणे तुपाचं सेवन करतो, तेव्हा रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचेला नैसर्गिक गुलाबी रंग येतो. तुपातील फॅटी अॅसिड्स त्वचेचा कोरडेपणा घालवून हायड्रेट ठेवतात. परिणामी चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तसेच शरीरातील कोलेजन वाढवण्यासाठी आपल्याला संतुलित आहार, फळे, भाज्या, भरपूर पाणी पिणं आणि चांगली झोप घेणं देखील महत्त्वाचं आहे. नैसर्गिकरित्या त्वचा निरोगी राखायची असेल तर आपल्याला मर्यादित प्रमाणात तूप आहारात घ्यायला हवं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Katrina Kaif's glow secret: Ghee for youthful, wrinkle-free skin!

Web Summary : Katrina Kaif and Deepika Padukone maintain youthful skin with a simple secret: ghee. Nutritionist Shweta Shah recommends daily ghee consumption to boost collagen naturally. Ghee hydrates skin, reduces wrinkles, and promotes a healthy glow from within. A balanced diet and good sleep are also crucial.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसेलिब्रिटी