Black Hair Home Remedies : काळे, लांब आणि दाट केस असावेत असं सगळ्यांनाच वाटत असतं. पण आजकाल पोषणाची कमतरता, प्रदूषण, चुकीची लाइफस्टाईल यामुळे कमी वयातच केस पांढरे होऊ लागले आहेत. केस पांढरे झाल्यावर लूक तर खराब होतोच, अनेकांचं लग्नही जुळत नाही. अशात पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर केला जातो. पण यामुळे केस आणखी खराब होतात. अशात पांढरे झालेले केस काळे करण्याचा एक नॅचरल उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पांढरे केस काळे करण्याचा नॅचरल उपाय
बरेच लोक कमी वयातच पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी महागड्या प्रोडक्ट्सची वापर करतात. तुम्हीही पांढरे केस काळे करण्याचे वेगवेगळे उपाय करून थकले असाल तर आणखी नॅचरल उपाय करू शकता. या उपायानं तुमचे पांढरे केस काळे होतील. महत्वाची बाब म्हणजे या उपायाचे काही साइड इफेक्ट्सही नाहीत.
पांढरे केस काळे करण्यासाठी कलौंजी
कलौंजीचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो. तसेच याचा वापर वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्समध्येही केला जातो. यानं केस काळे करण्यास तर मदत मिळतेच, सोबतच केसांची वाढही होते. कलौंजीचा जर तुम्ही एक महिना वापर केला तर केस मुळापासून काळे होतील.
कलौंजीचे फायदे?
कलौंजीच्या बिया एक औषधी वनस्पती आहे. यात पोटॅशिअम, सोडिअम, फायबर, आयर्न आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. तसेच यात अमीनो अॅसिड आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, ज्यामुळे केस खोलवर कंडिशनिंग होतात.
कसा कराल वापर?
- केसांना कलौंजी लावण्यासाठी १० ते १२ चमचे कलौंजी एका तव्यावर भाजून घ्या.- बिया थंड झाल्यावर त्याचं पावडर तयार करा.
- आता एका वाटीमध्ये २ चमचे कलौंजी पावडर, २ चमचे माइल्ड शाम्पू आणि पाणी टाकून पेस्ट तयार करा.
- ही पेस्ट केसांना चांगल्याप्रकारे लावा.
- साधारण २० मिनिटं ही पेस्ट केसांना तशीच ठेवा आणि नंतर केस शाम्पूनं धुवून घ्या.
साधारण एक महिना हा उपाय नियमितपणे केल्यास केस नॅचरली काळे होतील.