जया किशोरी आपल्या कथांसाठी आणि भजनांसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या चमकदार त्वचेमुळे देखील त्या चर्चेत असतात.(Jaya Kishor beauty secret) सध्याच्या काळात प्रत्येकाला चमकदार आणि ग्लोइंग त्वचा हवी असते. महागडे फेशवॉश, साबण, क्रिम्स, सिरमसारखे हजारो प्रॉडक्ट्स आपल्याला मिळतात.(Jaya Kishor face pack) पण जया किशोरी यांची त्वचा नेहमीच आपल्याला गोरी पाहायला मिळते. (Natural glow skin tips)
जया किशोरने अलीकडे एका मुलाखतीत तिच्या चेहऱ्याबद्दल विचारण्यात आलं. ती रोज साबणाने चेहरा धुत नाही. उलट, ती आठवड्यातून दोन ते तीन वेळा घरातच तयार केलेला नैसर्गिक फेसपॅक वापरते.(Beauty tips for glowing skin) केमिकल्स असणाऱ्या साबणामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि रफ होते. पण घरच्या नैसर्गिक घटकांनी तयार केलेला फेसपॅक त्वचेला ओलावा, पोषण आणि नैसर्गिक तेज देतो.(Celebrity skincare routine)
एका मुलाखतीत त्यांनी असं सांगितलं की, लहानपणापासूनच चेहऱ्याला दही आणि बेसनाचा फेस पॅक लावते. हा फेस पॅक तिची त्वचा नैसर्गिकरित्या उजळवण्यास मदत करतो. तसेच चेहऱ्यावरील डागही कमी होतात. हा घरगुती नैसर्गिक उपाय त्वचेला चमक देतो.
हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला २ चमचे बेसन, १ चमचा दही आणि अर्धा चमचा हळद लागेल. सगळ्यात आधी एका भांड्यात बेसन घाला. नंतर त्यात दही आणि हळद घालून त्याची पेस्ट बनवा. हा पॅक आपल्या त्वचेला नैसर्गिक चमक देतो. झोपण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ करा. त्यानंतर हा फेस पॅक लावून १० ते १५ मिनिटे सुकू द्या. यानंतर साध्या पाण्याने धुवून हलके मॉइश्चरायझर लावा. आठवड्यातून २ ते ३ वेळा असं केल्याने आपल्याला काही दिवसात फरक दिसेल. आपली त्वचा मऊ आणि चमकदार होण्यास मदत होईल.
जर आपल्यालाही नैसर्गिक पद्धतीने त्वचा सुंदर, मऊ आणि ग्लोइंग बनवायची असेल, तर जया किशोरचा हा घरगुती फेसपॅक नक्की वापरून बघा. या दिवाळीत महागड्या पार्लर ट्रीटमेंट विसरा आणि आजीच्या काळचा हा सोपा पण प्रभावी उपाय करून पहा.