Join us
Daily Top 2Weekly Top 5

तरुणपणी घोट्यापर्यंत लांब होते जया बच्चनचे केस, तेलात मिसळवून लावायच्या २ गोष्टी, पाहा सोपा बंगाली फॉर्म्युला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2026 17:00 IST

Bollywood actresses hair care secrets: Jaya Bachchan hair care: Jaya Bachchan long hair: जाणून घेऊया, जया बच्चन यांचा काय आहे तो 'बंगाली फॉर्म्युला' आणि त्या २ खास गोष्टी ज्यामुळे त्यांचे केस लांबसडक आहेत.

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन कायम चर्चेत असतात. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात अशा अनेक अभिनेत्री होत्या ज्या केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नाही, तर त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीही ओळखल्या जात होत्या.(Bollywood actresses hair care secrets) त्यापैकी एक म्हणजे जया बच्चन. ७० आणि ८० च्या दशकात त्यांच्या सौंदर्याची चर्चा घराघरात होती. विशेषतः त्यांचे घोट्यापर्यंत लांब, काळेभोर आणि रेशमी केस. (Jaya Bachchan hair care) अनेकदा आपल्याला वाटते की सेलिब्रिटींचे केस हे केवळ महागड्या ट्रिटमेंट्स किंवा पार्लरमधील जादू असते. पण जया बच्चन यांच्या बाबतीत तसं नव्हतं. (Jaya Bachchan long hair)

मी अब्सेंट बाप होतो, मुले मोठी झाली पण मी.. ! राम कपूरने सांगितली खंत, बापाची अस्वस्थ गोष्ट

पश्चिम बंगालमधील स्त्रियांच्या केसांचे सौंदर्य हे त्यांच्या आरोग्याचे आणि सौंदर्याचे लक्षण मानले जाते. बंगाली घरांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेले काही खास घरगुती फॉर्म्युले आजही वापरले जातात. जया बच्चन यांनी एका मुलाखतीत सांगितलं होते की, त्यांच्या आईने त्यांना लहानपणापासूनच नैसर्गिक गोष्टींचा वापर करायला शिकवल. सध्याच्या धावपळीच्या जगात आपण केमिकल्सचा वापर करुन केस खराब करतो. पण त्यांनी काही सोप्या घरगुती उपायांनी केसांना लांबसडक आणि काळेभोर ठेवले होते. जाणून घेऊया, जया बच्चन यांचा काय आहे तो 'बंगाली फॉर्म्युला' आणि त्या २ खास गोष्टी ज्यामुळे त्यांचे केस लांबसडक आहेत. 

लांबसडक केसांसाठी जया बच्चन सांगतात नारळाच्या तेलाला गरम करुन त्यात मूठभर कढीपत्ता आणि मेथीचे दाणे घाला. तेल थंड झाल्यानंतर गाळून घ्या. या तेलांने केसांना चांगला मसाज करा. नारळाचे तेल, मेथी दाणे आणि कढीपत्ता केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. नारळाचे तेल केसांना खोल मुळापर्यंत पोषण देते. टाळूला मॉइश्चरायझ करते. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो. नारळाच्या तेलात लॉरिक अॅसिड असते, जे केस तुटण्यापासून रोखण्यास मदत करते. 

मेथीमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक अॅसिड असते, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. तसेच मेथीच्या दाण्यामध्ये फॉलिक अॅसिड आणि लोहासारखे पोषक घटक असतात. जे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कढीपत्त्यामध्ये बीटा- कॅरोटीन आणि अमीनो अॅसिड असतात. जे केसांना वाढण्यास आणि जाड करण्यास मदत करतात. तसेच पांढऱ्या केसांसाठी हे तेल उपयुक्त आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Jaya Bachchan's long hair secret: Bengali hair growth formula revealed!

Web Summary : Jaya Bachchan's long, beautiful hair was due to a simple Bengali formula. Her mother taught her to use natural ingredients like coconut oil, curry leaves, and fenugreek seeds. These ingredients promote hair growth, reduce breakage, and prevent graying for healthy, lustrous locks.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीजया बच्चन