Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात केस कोरडे झाले-सतत गळतात? जावेद हबीब सांगताहेत १ वाटी दह्याचा जादूई उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 19:28 IST

Jawed habib Says Apply Curd On Your Hairs : हेअर एक्सपर्ट जावेद हबीब (Jawed Habib) यांनी केसांना दही लावण्याचा एक खास उपाय शेअर केला आहे.

केसांची योग्य पद्धतीनं काळजी घेतली नाही तर केस कोरडे होऊ लागतात.  केस कोरडे झाले की  हळूहळू केसांची नैसर्गिक चमक कमी होऊ लागते. ज्यामुळे केसांना नैसर्गिक पोषण मिळणं कमी होतो. या ड्रायनेसमुळे केसांना व्यवस्थित पोषण मिळत नाही. याशिवाय केस गळतात सुद्धा.  (Jawed habib Says Apply Curd On Your Hairs)

हेअर एक्सपर्ट जावेद हबीब (Jawed Habib) यांनी केसांना दही लावण्याचा एक खास उपाय शेअर केला आहे. जावेद हबीब हे प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट असून त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी दही लावून केसांना मऊ, मुलायम करण्याचा उपाय सांगितला आहे. 

जावेद हबीब सांगतात केसांना दही लावा

एक वाटीभर दही घेऊन केसांच्या मुळांना हलक्या हातानं मालिश करा. २० मिनिटांसाठी तसंच ठेवून द्या. त्यानंतर शॅम्पूनं केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून फक्त एकदा हा उपाय  केला तरी केस काळेभोर, दाट होतील.  मोठ्यांसह लहान मुलांसाठीसुद्धा हा उपाय फायदेशीर ठरेल.

जावेद हबीब यांनी या आधीही व्हिडिओ शेअर करत  दहृयाचा एक उपाय सांगितला होता. त्यानुसार एक वाटी दह्यात मोहोरीच तेल मिसळून घ्या. १ कप दह्यात २ ते ३ चमचे मोहोरीचं तेल मिसळू शकता. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिसळल्यानंतर केसांना व्यवस्थित लावा. ५ ते ७ मिनिटं केसांवर व्यवस्थित मसाज करा.  नंतर केस धुवून घ्या. हा उपाय केल्यास केस मुलायम होतील.

कोरड्या केसांसाठी हेअर मास्क

दूध आणि मधाचा हेअर मास्क केसांना सॉफ्ट आणि मुलायम बनवण्यास मदत करतो. हा पॅक लावण्यासाठी एक वाटी दुधात थोडं मध मिसळा आणि व्यवस्थित एकजीव करून घ्या. या मिश्रणानं केस मऊ-मुलायम होण्यास मदत होईल.

नारळाचं  तेल आणि ऑलिव्ह ऑईल एका वाटीत एकत्र करून केसांवर लावा आणि एक तासानंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवा. या उपायामुळे केस सॉफ्ट होण्यास मदत होईल.

केसांना तुम्ही केळी आणि नारळाच्या तेलाचा हेअर मास्कसुद्धा लावू शकता.  हा हेअर मास्क तयार करण्यासाठी १ ते २ चमचे नारळाचं तेल आणि पिकलेली केळी घेऊन एकजीव करून केसांना लावा. अर्धा तास केसांना लावून नंतर धुवून टाका. ज्यामुळे केसांमध्ये फरक जाणवेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Jawed Habib's curd remedy for dry, falling hair in summer.

Web Summary : Hair expert Jawed Habib suggests applying curd to dry hair for shine and strength. Mix curd with mustard oil, massage into the scalp, and wash off after 20 minutes. Other remedies include milk and honey or coconut and olive oil.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी