Join us

केस कोरडे बेजान दिसतात? जावेद हबीब सांगतात केस धुताना ‘हा’ पदार्थ लावा, होतील मऊमऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:19 IST

Jawed Habib Said Apply Glycerine On Hairs For Soft Hairs : शॅम्पूनं केस धुतल्यानंतर कंडिशनरमध्ये थोडं ग्लिसरिन मिसळा. नंतर केसांना लावा

आपले केस सौंदर्य खुलवण्यात मदत करतात. प्रत्येकालाच असं वाटतं की आपले केस लांबसडक-दाट असावेत. यासाठी बरेच घरगुती उपायही केले जातात (Hair Care Tips). प्रसिद्ध हेअर स्टायलिश जावेद हबीब यांनी एक घरगुती उपाय सांगितला आहे. या उपायानं केस लांबसडक आणि काळे होण्यास मदत होईल. जावेद हबीब (Hair Expert Jawed Habib) हे नेहमीच केसांच्या आरोग्याबाबत सोशल मीडियावर फोटोज किंवा व्हिडीओज शेअर करत असतात. ( Jawed Habib Said Apply Glycerine On Hairs For Soft, Shiny Hairs)

जावेद हबीब यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी केसांना ग्लिसरिन लावण्याचे फायदे सांगितले आहेत. हेअर स्टायलिश सांगतात की जर तुमचे केस कोरडे,फ्रिजी दिसत असतील तर ग्लिसरिन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

ग्लिसरिनचा वापर कसा करावा?

शॅम्पूनं केस धुतल्यानंतर कंडिशनरमध्ये थोडं ग्लिसरिन मिसळा. नंतर केसांना लावा आणि काहीवेळ तसंच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्यानं केस धुवून घ्या. जावेद हबीब सांगतात की हा उपाय केल्यानं तुम्हाला खूपच चांगला रिजल्ट दिसून येईल. या उपायानं केस मऊ, मुलायम होतील.

ग्लिसरीन कसं काम करतं?

ग्लिसरीन एक नैसर्गिक ह्युमेक्टेंट आहे. ज्यामुळे त्वचा आणि केस दोन्हींमध्ये मॉईश्चर टिकून राहतं. कंडीशनरमध्ये ग्लिसरीन मिसळून लावल्यानं केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि नैसर्गिक चमक येते. जर तुमचे केस कोरडे रफ असतील तर केसांची शाईन परत आणण्यासाठी जावेद हबीब यांनी सुचवलेला एक सोपा उपाय तुम्ही करू शकता.

केसांवर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार खर्च लागणार नाही. शॅम्पूनं केस धुतल्यानंतर ५ ते ६ थेंब ग्लिसरीन मिसळून लावा. ज्या लोकांचे केस खूपच लवकर गुंता होतात त्यांच्यासाठी ग्लिसरीन एक नॅच्युरल सोल्यूशन आहे.

ग्लिसरीन वापरण्याच्या पद्धती

पाण्यासोबत मिक्स करून तुम्ही हे वापरू शकता. त्यासाठी एका स्प्रे बाटलीमध्ये थोडे पाणी घ्या आणि त्यात ग्लिसरीनचे काही थेंब घाला. हे मिश्रण केसांना हलकेसे स्प्रे करा. नियमित कंडिशनर वापरताना त्यात ग्लिसरीनचे काही थेंब मिसळू शकता. यामुळे कंडिशनरचा प्रभाव वाढतो. कोणत्याही हेअर मास्कमध्ये ग्लिसरीन वापरता येते. दही, मध, मेथीच्या हेअर मास्कमध्ये ग्लिसरीनचे काही थेंब टाकल्यास मास्क अधिक प्रभावी होतो.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स