Join us
Daily Top 2Weekly Top 5

पातळ केसांचा वैताग आलाय-कायम गळतात? जावेद हबीबचा १ घरगुती उपाय, दाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 19:35 IST

Jawed Habib Coconut Milk Home remedy For Hair Growth : जावेद हबीब एक असा उपाय सांगत आहेत ज्यामुळे केसांची वाढ चांगली आणि भरभर होईल.

कितीही शॉर्ट केसांच्या फॅशन  आल्या तरी आपले केस लांबसडक-दाट असावेत असं प्रत्येक मुलीला वाटतं पण आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये केस गळणं, केस डॅमेज होणं खूपच सामान्य झालं आहे. केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्टस विकत घेण्यात महिलांना खूपच इंटरेस्ट असतो. पण या सगळ्यात घरगुती उपायांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. स्वयंपाकघरातील काही पदार्थ वापरून तुम्ही लांबसडक दाट केस मिळवू शकता. (Jawed Habib Coconut Milk Home remedy For Hair Growth Know How to Make It)

प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब (Jawed Habib) यांनी एक कमालीचा उपाय सांगितला आहे. हा उपाय केल्यास तुम्हाला सतत महागडी उत्पादनं केसांवर लावण्याची गरजच भासणार नाहीत. ज्यामुळे केस लांबसडक आणि दाटही होतील. जावेद हबीब एक असा उपाय सांगत आहेत ज्यामुळे केसांची वाढ चांगली आणि भरभर होईल. हा उपाय करण्यासाठी तुम्ही नारळाच्या दुधाचा वापर करू शकता. ज्यामुळे स्काल्प हायड्रेटेड राहील आणि नैसर्गिकरित्या हेअर फॉल कमी होण्यासही मदत होईल. 

जावेद हबीब यांनी सुचवलेला घरगुती उपाय कोणता?

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला २ वस्तूंची गरज लागेल. ताज्या नारळाचं घरी काढलेलं दूध आणि २ चमचे मध.  कच्च नारळ बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये घाला त्यात थोडं पाणी घालून किंवा दूध घालून ब्लेंड करून घ्या आणि गाळून घ्या. यामुळे ताजं नारळाचं दूध घरीच तयार होईल. यात तुम्ही काही प्रमाणात मध मिसळू शकता.

केसांवर कसे लावायचे?

केस हलकेच ओले करा. नंतर हे मिश्रण केसांच्या लांबीला लावून व्यवस्थित मसाज तकरा. हलक्या हातानं मसाज करून २० ते ३० मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. तुम्ही शॉवर कॅप लावू शकता जेणेकरून मास्क सुकणार नाही. नंतर थंड पाणी आणि माईल्ड शॅम्पूनं केस धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास केसांवर चांगला परिणाम दिसून येईल.

काय फायदे होतील?

या उपायानं केसांची मुळं मजबूत होण्यास मदत होईल. याशिवाय केस चांगले वाढतील तसंच केसाचं गळणंही कमी होईल ज्यामुळे केस सॉफ्ट आणि चमकदार होतील. जावेद हबीब सांगतात की हा उपाय नैसर्गिक पद्धतीनं काम करतो आणि केसांसाठी उपयुक्त ठरतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Jawed Habib's home remedy for thick hair growth: Coconut milk.

Web Summary : Hair expert Jawed Habib suggests using coconut milk and honey for hair growth. This homemade remedy strengthens hair roots, reduces hair fall, and makes hair soft and shiny. Apply this mask 2-3 times a week for best results.
टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स