Jawed Habib Hair Care Tips: आजकाल बदलतं वातावरण आणि बदलत्या लाइफस्टाईलमुळे आपल्याला आरोग्यासंबंधी म्हणा किंवा त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतोय. कुणाला हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे तर कुणी वाढत्या शुगरमुळे चिंतेत आहे. पण आज सर्वाधिक लोक ज्या समस्येमुळे त्रस्त आहेत ती म्हणजे केस गळतीची समस्या. पुरुषांसोबतच महिलांनाही ही समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. यासाठी लोक अनेक महागडे प्रॉडक्ट्स वापरतात, पण फायदा मिळतोच असं नाही. अशावेळी प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी सांगितलेला एक चमत्कारी उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
केसांची काळजी घेणे आवश्यक
हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्यानुसार, केसांची योग्य काळजी घेतल्यास केसगळती थांबवता येते आणि केसांना पोषण मिळतं. नियमितपणे जर केसांची काळजी घेतली नाही तर केस गळणे, कमजोर होणे, कोंडा इत्यादी समस्या निर्माण होतात.
जावेद हबीब यांचा उपाय काय आहे?
जावेद हबीब हेच सांगतात की, सगळ्यात आधी केस स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जे लोक केस स्वच्छ ठेवत नाहीत त्यांना केसगळतीची समस्या जास्त प्रमाणात होते. केसांवर साचलेली धूळ, प्रदूषण आणि तेलकटपणा दूर करण्यासाठी रोज केस धुणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी ‘प्री कंडिशनिंग’ नावाची पद्धत सांगितली आहे.
काय आहे पद्धत?
सर्वप्रथम केस हलकेसे ओले करा. त्यानंतर केसांवर तेल लावा. तेल लावल्यानंतर मसाज करू नका, फक्त 5 ते 10 मिनिटे तसेच ठेवून द्या. मग शाम्पू, कंडिशनर किंवा शिकेकाईसारख्या हर्बलनी केस धुवा. दररोज हे तीन उपाय जर आपण पाळले, तर केस गळणे थांबेल आणि केस मुलायम, मजबूत राहतील.
केस होणार नाहीत खराब
जावेद हबीब म्हणतात की, जी व्यक्ती रोज ही प्रक्रिया करचे आणि केस स्वच्छ ठेवते, त्याचे केस कधीच खराब होणार नाहीत. त्याना केसगळती, कोंडा किंवा कोरडेपणा यांसारख्या समस्या होणार नाहीत.