केसांची चांगली वाढ व्हावी केस लांब, घनदाट कोंडामुक्त राहावेत यासाठी प्रसिद्ध हेअर एक्सपोर्ट जावेद हबीब यांनी एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. तो उपाय म्हणजे तुरटीचा. तुरटी ही सामान्यत: पाण्यात मिसळून पाणी शुद्ध करण्याासठी वापरली जाते. पण तिच्यातील एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुणधर्म केसांसाठी खूप फायदेशीर ठरतात. हा उपाय कसा करावा, याचे फायदे काय आहेत याबात सविस्तर समजून घेऊ. ( Javed Habib tells about the solution of dandruff And Hair Fall)
जावेद हबीब यांच्यामते तुरटीचा हा उपाय अत्यंत सोपा आहे. यासाठी तुम्हाला मध्यम आकाराचा तुरटीचा खडा घ्यावा लागेल. केस धुतल्यानंतर आणि कंडिशनर लावण्यापूर्वी तुरटीचा खडा एका मगभर पाण्यात दोन ते तीन वेळा फिरवा. यामुळे तुरटीचे घटक त्या पाण्यात मिसळतील. हे तुरटीचे पाणी नंतर आपल्या डोक्याच्या त्वचेवर आणि केसांवर ओता आणि हलक्या हातानं मसाज करा. त्यानंतर केस लगेच धुवू नका. हे पाणी केसांवर तसंच राहू द्या. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा उपाय केल्यास तुम्हाला चांगला परीणाम दिसून येईल. तुरटीच्या पाण्याचा हा उपाय केसांसाठी एका नैसर्गिक टोनरप्रमाणे काम करेल.
केसांसाठी तुरटीचे फायदे
तुरटीचा उपाय अनेक प्रकारच्या केसांच्या समस्यांवर प्रभावी आहे. तुरटीमध्ये असलेले एंटी फंगल गुणधर्म कोंडा निर्माण करणाऱ्या बुरशीला मारण्यास मदत करतात. ज्यामुळे कोंड्याची समस्या कमी होते.
तुरटी टाळूवरील अतिरिक्त तेल, घाण आणि डेड स्किन सेल्स प्रभावीपणे काढून टाकते ज्यामुळे टाळू स्वच्छ आणि निरोगी राहतो. टाळूच्या त्वचेचे आरोग्य केसांच्या कुपांना बळकटी देते.
रात्री जेवणानंतर लगेच चालायला गेल्यानं वजन पटकन घटतं? पाहा कसं-किती चालावं...
टाळू स्वच्छ आणि निरोगी राहिल्यानं केसांच्या वाढीसाठी योग्य वातावरण तयार होते. रक्ताभिसरण सुधारल्यास केसांची मुळं मजबूत होतात आणि केस लांब, घनदाट होण्यास मदत होते.
भात भरपूर खाऊनही साऊथ इंडियन माणसांचं वजन भरमसाठ का वाढत नाही? पाहा भात शिजवण्याची पारंपरिक पद्धत..
टाळूचे आरोग्य सुधारल्यामुळे आणि केसांची मुळं मजबूत झाल्यामुळे केस गळण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते. हा सोपा आणि नैसर्गिक उपाय नियमितपणे केल्यास तुमचे केस नक्कीच लांब, चमकदार आणि कोंडामुक्त होण्यास मदत होईल.
