Join us

केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी जावेद हबीबनं सांगितलं सोपा उपाय, केसही वाढतील आणि चमकदार होतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 13:03 IST

Home Remedy For Dandruff Removal : प्रसिद्ध हेअर स्टायलिश जावेद हबीब (Javed Habib) यानं केसांमधील कोंडा दूर करण्याचा एक सोपा घरगुती उपाय सांगितला आहे. महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला तुमच्या किचनमधीलच काही गोष्टी उपयोगी पडू शकतात.

Home Remedy For Dandruff Removal : केसांमध्ये कोंडा होणं ही एक फारच कॉमन समस्या आहे. महिलांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. कारण त्यांचे केस लांब असतात आणि रोज धुतले जात नाहीत. तसेच केसांमध्ये कोंडा वाढण्याची कारणंही महिलांमध्ये वेगळी असतात. पण केसांमधील कोंडा अनेकदा चारचौघांमध्ये मान खाली घालायला लावतो. कारण एकतर कोंडा दिसून पडतो आणि डोकंही सतत खाजवतं. ऑफिसमध्ये तर यामुळे अधिकच फजिती होते. बरं असं नाही की, केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी काही उपाय केले जात नाहीत. पण त्यांचा फार काही फायदा होत नाही. अशात प्रसिद्ध हेअर स्टायलिश जावेद हबीब (Javed Habib) यानं केसांमधील कोंडा दूर करण्याचा एक सोपा घरगुती उपाय सांगितला आहे. महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला तुमच्या किचनमधीलच काही गोष्टी उपयोगी पडू शकतात.

कोंडा दूर करण्याचा उपाय

जावेद हबीबनं सांगितलं की, डोक्याच्या त्वचेमध्ये आणि केसांमध्ये चिकटून बसलेला कोंडा दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टींची गरज आहे. या गोष्टी म्हणजे शाम्पू आणि तुरटी. शाम्पूमध्ये तुरटीचं पावडर मिक्स करून केस धुतल्यानं केसांमधील कोंडा लगेच दूर होतो. सोबतच तुरटीमुळे केस चमकदार आणि मुलायमही होतात. तुम्ही जर आठवड्यातून एकदाही हा उपाय केला तर फरक दिसून येईल. 

हे घरगुती उपायही ठरतील फायदेशीर

- केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी घरातील इतरही काही गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता. दही यासाठी खूप फायदेशीर ठरतं. कोंडा दूर करण्यासाठी एक वाटी दही केसांमध्ये लावा. हे तसंच 15 ते 20 मिनिटं लावून ठेवा आणि त्यानंतर केस धुवून घ्या. यानं कोंडा दूर होईल.

- बेकिंग सोडा सुद्धा केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. यासाठी एका वाटीमध्ये बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडं पाणी टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याच्या त्वचेवर लावून केस धुतल्यास कोंडा दूर होईल.

- लिंबाच्या रसाचे त्वचेला जसे अनेक फायदे मिळतात. तसेच केसांनाही मिळतात. लिंबाचा रस डोक्याच्या त्वचेवर लावल्यास केसांमधील कोंडा दूर होतो. तसेच यानं डोक्याच्या त्वचेची चांगली सफाई सुद्धा होते. दह्यात मिक्स करूनही लिंबाचा रस डोक्यावर लावू शकता.

- मेथीचे दाणेही केसांसाठी फायदेशीर ठरतात. मेथीचे दाणे भिजवून ठेवा आणि नंतर त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याच्या त्वचेवर लावा आणि नंतर केस धुवून घ्या. कोंडा तर जाईलच, सोबतच केस वाढण्यासही मदत मिळेल.

- खोबऱ्याच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करून लावल्यासही कोंडा दूर होण्यास मदत मिळते. खोबऱ्याचं तेल आणि लिंबाच्या रसाचं मिश्रण डोक्यावर 20 ते 30 मिनिटं लावून ठेवा. नंतर केस धुवून घ्या. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स