केस गळणं, केसांत कोंडा होणं या समस्या आजकाल प्रत्येकालाच उद्भवतात. केसाचं गळणं कमी करण्यासाठी आणि केस कमीत कमी तुटावेत यासाठी प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी काही उपाय सांगितले आहेत. जावेद हबीब हे केमिकलयुक्त उत्पादनं न वापरता नेहमी घरगुती नैसर्गिक वस्तू वापरण्याचा सल्ला देतात. जावेद हबीब यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही केसांना जितक्या घरगुती पदार्थांचा वापर कराल तितकेच केस चांगले राहतील. (Javed Habib says apply this product with coconut oil your hair will become thick and shiny)
आपल्या इंस्ट्राग्राम पेजवर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते सांगतात की, केस गळती, कोंडा होणं, उवा होणं या सगळ्या केसांच्या समस्यांवर एकच उपाय आहे. हा उपाय एक साधा सोपा घरगुती उपाय आहे. एका वाटीत नारळाचं तेल आणि कापूर एकत्र करा. कापूर व्यवस्थित तेलात मिसळल्यानंतर ब्रशच्या साहाय्यानं हे तेल एक एक सेक्शन काढून स्काल्पवर लावा. स्काल्पवर कोंडा जमा होतो म्हणून स्काल्पवर हे तेल लावणं गरजेचं आहे. त्यानंतर 15 मिनिटं असंच राहू द्या मग शॅम्पूनं केस स्वच्छ धुवा. या उपायानंतर केस स्वच्छ झालेले दिसून येतील.
नारळाचे तेल आणि कापूर केसांवर कसे काम करते?
नारळाचे तेल केसांच्या मुळांना पोषण देते. कापूर टाळूमधील रक्तप्रवाह मजबूत करतो आणि हेअर फॉलिकल्सना पोषण देतो. ज्यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होते. नवीन केस वाढण्यास मदत होते आणि टक्कल पडण्याची समस्या कमी होण्यास होते.
कापूरातील एंटीफंगल आणि एंटीबॅक्टेरिअल गुण टाळूवरील बुरशी आणि बॅक्टेरिया कमी करतात. ज्यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते. केसांना थंडावा मिळतो आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. हे मिश्रण केस वाढवते आणि केस गळण्याची समस्या कमी करते.
कापूर आणि नारळाचे तेल कधी वापरावे?
कोरड्या हवामानात नारळाचे तेल केसांना आवश्यक ओलावा (Moisture) देते आणि कोरडेपणा टाळते. ऊन्हाळ्यात नारळाचे तेल केसांना पोषण देते आणि कोरडेपणा येऊ देत नाही. कापूर टाळूला थंडावा देतो आणि खाज संसर्ग कमी करण्यास मदत करतो. कापूर टाळूवरील अतिरिक्त सेबम आणि तेल साफ करण्यास मदत करतो.