Join us
Daily Top 2Weekly Top 5

जपानी तरुणींचं ब्यूटी सिक्रेट, १५ मिनिटांत चेहऱ्यावर चमक आणणाऱ्या ६ गोष्टी- कायम दिसतात तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2026 16:58 IST

Japanese beauty secrets: Japanese skincare routine: face glow in 15 minutes: १५ मिनिटांत चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काय करावं?

सौंदर्याच्या जगात जपानी महिलांची त्वचा ही कायम सुंदर मानली जाते. वयाची चाळीशी ओलांडली तरी त्यांच्या चेहऱ्यावर विशीतल्या तरुणींसारखा नैसर्गिक तजेलदार होतो. आपण महागड्या ब्युटी पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करतो, पण जपानी स्त्रिया मात्र स्वयंपाकघरातील नैसर्गिक घटकांवर अधिक विश्वास ठेवतात.(Japanese beauty secrets)जपानी महिलांची त्वचा जगभरात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. वाढतं वय असूनही त्यांचा चेहरा नितळ, मऊ आणि तेजस्वी दिसतो.(Japanese women youthful skin) महागड्या केमिकल ट्रीटमेंट्स किंवा मेकअपपेक्षा त्या निसर्गाशी जोडलेले, साधे पण प्रभावी उपाय अधिक पसंत करतात.(natural glow skincare) जपानी स्किनकेअरचं वैशिष्ट्य म्हणजे त्वचेची खोलवर काळजी घेणं. विशेष म्हणजे त्यांच्या काही पारंपरिक उपायांमुळे अवघ्या १५ मिनिटांत चेहऱ्यावर ग्लो येतो. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी काय करायला हवं, पाहूया. 

टक्कल पडलेल्या जागी केस उगवतील नव्याने; १० रुपयांचा घरगुती उपाय, वयाच्या पन्नाशीतही केस लांबसडक-घनदाट, वाढतील भरपूर

1. जपानी महिला त्यांचे चेहरे हळूवारपणे स्क्रब करतात. जास्त स्क्रबिंग केल्याने त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि सुरकुत्या येतात. त्यासाठी सौम्य क्लींजर आणि कोमट पाण्याचा वापर करतात. 

2. जपानमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी शतकानुशतके तांदळाचे पाणी वापरले जाते. त्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचा घट्ट करतात. बारीक रेषा कमी करण्यास मदत करतात. अनेक जपानी महिला त्यांच्या चेहऱ्यावर तांदळाचे पाणी चेहऱ्याला लावा. 

3. सूर्याच्या अतिनिल किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सनस्क्रिन देखील लावतात. घराबाहेर पडण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रिन लावल्याने त्वचेचे वृद्धत्व, काळे डाग आणि सुरकुत्या टाळण्यास मदत होते. 

4. जपानी मुली त्वचेच्या काळजी घेण्यासाठी ग्रीन टीचा वापर करतात. ग्रीन टी केवळ पिण्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते. याचे थंड केलेले पाणी टोनरसारखे वापरल्यास चेहऱ्यावरील सूज कमी होते आणि डाग फिके होतात. 

5. त्वचेला कायम मॉइश्चरायझ करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात आधी हलका टोनर, नंतर सीरम, नंतर मॉइश्चरायझर लावा. हे त्वचेला जास्त काळ हायड्रेट ठेवते आणि कोरडेपणामुळे होणाऱ्या सुरकुत्या टाळते.

6. त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी आपल्याला पुरेशी झोप घेणं आणि कमी ताण घ्यायला हवा. पुरेशी झोप त्वचेला दुरुस्ती करण्याचे काम करते. ज्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास मदत करते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Japanese Beauty Secrets: 6 Steps to Radiant, Youthful Skin in 15 Minutes

Web Summary : Japanese women maintain youthful skin using natural methods. Key secrets include gentle exfoliation, rice water, sunscreen, green tea toner, consistent moisturizing, and prioritizing sleep and stress reduction. These simple steps promote glowing, healthy skin.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी