Lokmat Sakhi >Beauty > जान्हवी कपूर वापरते आई श्रीदेवीने सांगितलेला घरगुती फेसपॅक! त्वचेसाठी आहे खास - मायलेकींचे ब्यूटी सिक्रेट...

जान्हवी कपूर वापरते आई श्रीदेवीने सांगितलेला घरगुती फेसपॅक! त्वचेसाठी आहे खास - मायलेकींचे ब्यूटी सिक्रेट...

Janhvi Kapoor Uses Her Mother Secret Recipe For Soft & Healthy Skin : janhvi kapoor mother skincare recipe : janhvi kapoor home remedy for skin : Janhvi Kapoor skin care secret : आई श्रीदेवीने जान्हवीला सांगितलेल्या सिक्रेट फेसपॅकमुळे, आजही जान्हवीची त्वचा सुंदर, निरोगी आणि छान दिसते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2025 13:25 IST2025-09-20T13:25:07+5:302025-09-20T13:25:45+5:30

Janhvi Kapoor Uses Her Mother Secret Recipe For Soft & Healthy Skin : janhvi kapoor mother skincare recipe : janhvi kapoor home remedy for skin : Janhvi Kapoor skin care secret : आई श्रीदेवीने जान्हवीला सांगितलेल्या सिक्रेट फेसपॅकमुळे, आजही जान्हवीची त्वचा सुंदर, निरोगी आणि छान दिसते.

Janhvi Kapoor Uses Her Mother Secret Recipe For Soft & Healthy Skin janhvi kapoor mother skincare recipe janhvi kapoor home remedy for skin | जान्हवी कपूर वापरते आई श्रीदेवीने सांगितलेला घरगुती फेसपॅक! त्वचेसाठी आहे खास - मायलेकींचे ब्यूटी सिक्रेट...

जान्हवी कपूर वापरते आई श्रीदेवीने सांगितलेला घरगुती फेसपॅक! त्वचेसाठी आहे खास - मायलेकींचे ब्यूटी सिक्रेट...

बॉलिवूडची यंग अभिनेत्री आणि श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर हिच्या सौंदर्याची चर्चा कायमच होत असते. जान्हवी तिच्या सुंदर, नितळ व तितक्याच ग्लोइंग त्वचेची कायम काळजी घेते. जान्हवीच्या (Janhvi Kapoor Uses Her Mother Secret Recipe For Soft & Healthy Skin) निरोगी आणि नैसर्गिकरीत्या चमकदार (janhvi kapoor mother skincare recipe) त्वचेचे सिक्रेट नेमकं काय आहे, हे जाणून घेण्याची अनेकींना उत्सुकता असते. बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या स्किनकेअर रुटीन बद्दल विचार केला असता, त्या महागड्या क्रीम्स आणि स्किन ट्रीटमेंट घेत असतील असा सरळ विचार मनात (Janhvi Kapoor skin care secret) येतो. परंतु याउलट, जान्हवी कपूर असे कोणतेही आर्टिफिशियल किंवा महागडे उपचार न करता, तिच्या आईने सांगितलेला एक खास घरगुती उपाय करते.

जान्हवीच्या तेजस्वी त्वचेचं सिक्रेट महागड्या प्रॉडक्ट्समध्ये नाही, तर तिची आई श्रीदेवीने सांगितलेल्या खास घरगुती उपायात दडलं आहे. त्वचा सुंदर दिसण्यासाठी जान्हवी इतर कोणतेही उपाय न करता, फक्त एक साधासुधा होममेड फेसपॅक वापरते. जान्हवी वापरत असलेला फेसपॅक आपण देखील घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात झटपट तयार करु शकतो. आई श्रीदेवी यांनी जान्हवीला सांगितलेल्या सिक्रेट फेसपॅकमुळे, आजही जान्हवीची त्वचा सुंदर, निरोगी आणि छान दिसते. श्रीदेवी - जान्हवी या माय - लेकी वापरत असलेला हा सिक्रेट फेसपॅक कसा तयार करायचा व त्याचे फायदे काय ते पाहूयात.  

सुंदर व ग्लोइंग त्वचेसाठी वापरा हा खास घरगुती फेसपॅक... 

श्रीदेवी - जान्हवी या माय - लेकी वापरत असलेला हा सिक्रेट फेसपॅक तयार करण्यासाठी, आपल्याला प्रत्येकी १ टेबलस्पून दही व मध आणि मॅश केलेल्या  केळ्याचा गर इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. आता एका बाऊलमध्ये, मॅश केलेलं केळ घेऊन त्यात १ टेबलस्पून दही व मध घालावे.

खोबरेल तेलात ठेवा बाल्कनीतल्या औषधी रोपांची २ पाने! लावताच दिसेल फरक, लांब-दाट होतील केस...

आता चमच्याने हे सगळे मिश्रण एकत्रित कालवून घ्यावे आणि फेसपॅक वापरण्यासाठी तयार आहे. आता आपण ही तयार पेस्ट थेट त्वचेवर लावून हलकेच बोटांनी चोळून मसाज करावा. मग १० ते १५ मिनिटे हा फेसपॅक त्वचेवर तसाच लावून ठेवावा त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. 

यासोबतच, इतरही टिप्स ठरतील फायदेशीर... 

१. वाफ घ्या :- त्वचेची छिद्रे उघडण्यासाठी आणि ती स्वच्छ करण्यासाठी चेहऱ्याला वाफ देणे देखील तितकेच गरजेचे असते. यासाठी, सर्वात आधी चेहरा साध्या पाण्याने धुऊन स्वच्छ करा. आता गरम पाणी घ्या. मग गरम पाण्याची वाफ थेट चेहऱ्यावर घ्या. आपण ३ ते ५ मिनिटे वाफ घेऊ शकता. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होईल. 

वयाच्या तिशीतच केस झाले पांढरेशुभ्र? जेवणात रोज खा 'ही' चमचाभर चटणी - पांढरे केस दिसणारच नाहीत...

२. बदामाचे तेल :- हा फेसपॅक काढल्यानंतर जान्हवी कपूर चेहऱ्यावर बदाम तेल लावते. विशेषतः, आपल्या डोळ्यांखाली हे तेल ती नक्की लावते. बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन 'ई' आणि इतर पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. बदाम तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. त्यानंतर जान्हवी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावून मगच घराबाहेर पडते.

हा घरगुती फेसपॅक लावण्याचे फायदे... 

१. केळं :- केळ्यामुळे त्वचेला नैसर्गिक मॉइश्चरायझेशन मिळते आणि त्वचा मऊ होते.

२. दही :- दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते आणि त्वचेला उजळवते.

३. मध :- मध त्वचेला खोलवर पोषण देते, मुरुमांचे डाग कमी करते आणि त्वचा चमकदार बनवते.

Web Title: Janhvi Kapoor Uses Her Mother Secret Recipe For Soft & Healthy Skin janhvi kapoor mother skincare recipe janhvi kapoor home remedy for skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.