दिवसभरातील कामाच्या धावपळीत किंवा एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या अॅक्टिव्हिटीज केल्याने शरीराला प्रचंड घाम येतो. घाम आल्याने शरीर पूर्णपणे घामाने भिजून जाते. सतत घाम येत राहिल्याने तसेच घामाचे थर त्वचेवर तसेच राहिल्याने हळूहळू घामाची कुबट अशी दुर्गंधी येऊ लागते. काहीवेळा ही घामाची दुर्गंधी इतकी तीव्र असते की हा घामाचा वास नकोसा वाटू लागतो. इतकेच नाही तर, या घामाच्या कुबट दुर्गंधीमुळे अनेकदा चारचौघात जाणे देखील आपल्यालाच लाजिरवाणे वाटते. घामाची दुर्गंधी कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या परफ्युम किंवा डिओचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. परंतु या परफ्युम किंवा डिओच्या सततच्या वापराने त्वचेला इजा होऊ शकते किंवा त्वचा काळी पडू शकते(Jacqueline fernandez odour control drink).
बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला देखील या घामाच्या दुर्गंधीच्या समस्येचा सामना करावा लागतो, तेव्हा ती एक खास उपाय करते. जॅकलिनने एका इंटरव्ह्यू दरम्यान, बॉडी ओडर कंट्रोल करण्यासाठी खास घरगुती ड्रिंक पीत असल्याचे सिक्रेट नुकतेच शेअर केले आहे. घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून जॅकलिन फर्नांडिस एक खास ड्रिंक पिते, ज्यामुळे बॉडी ओडर कंट्रोल करण्यास मदत होते. बॉडी ओडर कंट्रोल करण्यासाठी जॅकलिन कोणतेही डिओ, परफ्युम न वापरता नेमके कोणते ड्रिंक पिते आणि त्याची रेसिपी काय आहेत ते पाहूयात...
बॉडी ओडर कंट्रोल करण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस कोणते ड्रिंक पिते...
बॉडी ओडर कंट्रोल करण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस पिते ते घरगुती ड्रिंक तयार करण्यासाठी आपल्याला दूध किंवा बदामाचे दूध, गुलाबाच्या पाकळ्या, वेलची,दालचिनी, लवंग, चक्रफूल, मेपल सिरप इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
कृती :-
बॉडी ओडर कंट्रोल ड्रिंक तयार करण्यासाठी, सर्वातआधी एका पॅनमध्ये बदामाचे दूध ओतून घ्यावे. या व्हिडिओमध्ये जॅकलीनने बदाम दुधाचा वापर केला आहे. जर तुमच्याकडे बदाम दूध नसेल, तर तुम्ही साध्या दुधाचा देखील वापर करू शकता. दूध मध्यम आचेवर गरम करा. त्यानंतर यात गुलाबाच्या पाकळ्या, एक किंवा दोन वेलची ठेचून घाला. याचबरोबर, दालचिनीचा एक छोटा तुकडा, लवंग काड्या आणि चक्र फूल घाला. नंतर ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर गरम करून घ्या जेणेकरून मसाले दुधात चांगल्या प्रकारे विरघळतील.
गोड चवीसाठी आपण यात मेपल सिरप देखील घालू शकता. त्यानंतर हे मिश्रण एका कपात गाळून गरमागरम प्या. हे ड्रिंक हलके गरम किंवा कोमट असतानाच प्यायचे आहे. त्याचबरोबर, आपण हे ड्रिंक दररोज देखील पिऊ शकता. जॅकलीनच्या मते, जर तुम्ही हे ड्रिंक रोज आणि सातत्याने प्यायलात तर तुमच्या शरीराची दुर्गंधी नैसर्गिकरित्या कमी होऊ लागेल. यामुळे तुम्हाला परफ्यूम वापरण्याची गरजच लागणार नाही. हा घामाची दुर्गंधी कमी करण्याचा एक उत्कृष्ट घरगुती उपाय आहे.
