Lokmat Sakhi >Beauty > मॉईश्चरायझर लावून देखील त्वचा कोरडी - निस्तेज? नेहमीच्या ५ चुका त्वचेचे करतात नुकसान...

मॉईश्चरायझर लावून देखील त्वचा कोरडी - निस्तेज? नेहमीच्या ५ चुका त्वचेचे करतात नुकसान...

skin still dry after moisturizer : why is skin dry even after moisturizing : common mistakes when applying moisturizer : Is your skin still dry even after applying moisturizer : जर मॉईश्चरायझर लावून देखील आपली त्वचा कोरडी - निस्तेज व निर्जीव दिसत असेल तर काय करावे ते पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2025 13:31 IST2025-09-04T13:29:55+5:302025-09-04T13:31:12+5:30

skin still dry after moisturizer : why is skin dry even after moisturizing : common mistakes when applying moisturizer : Is your skin still dry even after applying moisturizer : जर मॉईश्चरायझर लावून देखील आपली त्वचा कोरडी - निस्तेज व निर्जीव दिसत असेल तर काय करावे ते पाहा..

Is your skin still dry even after applying moisturizer skin still dry after moisturizer why is skin dry even after moisturizing common mistakes when applying moisturizer | मॉईश्चरायझर लावून देखील त्वचा कोरडी - निस्तेज? नेहमीच्या ५ चुका त्वचेचे करतात नुकसान...

मॉईश्चरायझर लावून देखील त्वचा कोरडी - निस्तेज? नेहमीच्या ५ चुका त्वचेचे करतात नुकसान...

आपल्यापैकी बऱ्याचजणी त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी स्किनकेअर रुटीन कायम फॉलो करतात. त्वचेचे आरोग्य व सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण अनेक (why is skin dry even after moisturizing) उपाय करतो. त्वचेसाठी स्किनकेअर (skin still dry after moisturizer) रुटीन फॉलो करताना, त्वचेला दररोज योग्य पद्धतीने मॉईश्चराईझ करणे गरजेचे असते. त्वचेला मॉईश्चरायझर लावून मॉईश्चरायझिंग केल्याने त्वचेची योग्य ती काळजी घेतली जाते. स्किनकेअर रुटीन फॉलो करताना, त्वचा कोरडी, निर्जीव, निस्तेज दिसू नये म्हणून आपण मॉईश्चरायझर त्वचेला लावतो. परंतु अनेकदा मॉईश्चरायझर लावून देखील आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते(Is your skin still dry even after applying moisturizer).

जर तुम्हीसुद्धा रोज मॉइश्चरायझर वापरत असाल आणि तरीही तुमची त्वचा कोरडी पडत असेल, तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्वचेची योग्य ती काळजी घेण्यासाठी फक्त मॉईश्चरायझर लावणेच पुरेसे नसते, तर ते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने लावणे देखील आवश्यक असते. बरेचदा आपल्याला वाटते की फक्त मॉइश्चरायझर लावणे पुरेसे आहे, परंतु आपण काही अशा लहान - सहान चुका करतो, ज्यामुळे त्वचेची नैसर्गिक आर्द्रता मॉईश्चरायझर लावून देखील कमी होते. यासाठीच, जर मॉईश्चरायझर लावून देखील आपली त्वचा कोरडी - निस्तेज व निर्जीव दिसत असेल तर काय करावे ते पाहा.. 

मॉईश्चरायझर लावून देखील त्वचा कोरडी - निस्तेज व निर्जीव दिसते... 

१. चुकीच्या वेळी मॉइश्चरायझर लावणे :- तुम्ही मॉइश्चरायझर कधी लावता, हे देखील खूप महत्त्वाचे आहे. आंघोळ केल्यावर किंवा चेहरा धुतल्यावर, जेव्हा तुमची त्वचा थोडी ओलसर असते, तेव्हाच मॉइश्चरायझर लावण्याची सर्वात योग्य वेळ आहे. जर तुम्ही त्वचा पूर्णपणे कोरडी झाल्यावर मॉइश्चरायझर लावले, तर ते त्वचेची आर्द्रता त्वचेतच नैसर्गिक पद्धतीने साठवून ठेवू शकत नाही, त्यामुळे त्वचा पुन्हा कोरडी होते. 

२. शरीरातील पाण्याची कमतरता :- त्वचेची बाहेरुन काळजी घेण्यासोबतच, शरीराला आतून हायड्रेटेड (hydrated) ठेवणे देखील खूप महत्त्वाचे असते. जर तुम्ही दिवसभर पुरेसे पाणी पीत नसाल, तर तुमची त्वचा डिहायड्रेटेड होते. शरीरातील पाण्याच्या कमतरतेचा थेट परिणाम त्वचेवर दिसतो, ज्यामुळे ती  मॉईश्चरायझर लावून देखील कोरडी आणि निर्जीव दिसू लागते.

३. चुकीचे मॉइश्चरायझर निवडणे :- त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर निवडणे अत्यंत आवश्यक असते. बाजारात अनेक प्रकारचे मॉइश्चरायझर उपलब्ध आहेत, जसे की क्रीम-बेस्ड, जेल-बेस्ड किंवा लोशन. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल, तर हलके लोशन वापरण्याऐवजी शिया बटर (shea butter) किंवा हायलुरोनिक ॲसिड (hyaluronic acid) असलेले क्रीम-बेस्ड मॉइश्चरायझर वापरणे अधिक फायदेशीर ठरू शकते. कारण चुकीचे मॉइश्चरायझर निवडल्याने तुमची समस्या आणखी वाढवू शकते.


 
४. गरम पाण्याने आंघोळ करणे :- गरम पाण्याने आंघोळ करणे शरीरासाठी आरामदायक वाटू शकते, पण ते त्वचेसाठी अजिबात चांगले नाही. खूप जास्त गरम पाणी त्वचेवरील नैसर्गिक तेल काढून टाकते, ज्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते. हे टाळण्यासाठी, अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करा आणि आंघोळीचा वेळही कमी ठेवा.   

५. हार्श साबण किंवा फेसवॉशचा वापर :- हार्श साबण किंवा फेसवॉशमध्ये असे हानिकारक, आर्टिफिशियल रसायने असतात, जी त्वचेची नैसर्गिक आर्द्रता हिरावून घेतात. जर तुम्ही अशा उत्पादनांचा वापर करत असाल, तर मॉइश्चरायझर लावल्यानंतरही तुमची त्वचा कोरडी पडू शकते. नेहमी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार माईल्ड (mild) आणि हायड्रेटिंग क्लींजरचा वापर करा.

जर तुम्ही या ५ गोष्टींची काळजी घेतली, तर तुमची त्वचा केवळ मॉइश्चराइज्डच राहणार नाही, तर ती पूर्वीपेक्षा जास्त निरोगी आणि चमकदार दिसेल. त्यामुळे, आता पुढच्या वेळी जेव्हा तुमची त्वचा कोरडी वाटेल, तेव्हा फक्त मॉइश्चरायझर बदलण्याऐवजी, या सवयींकडेही नक्की लक्ष द्या.

Web Title: Is your skin still dry even after applying moisturizer skin still dry after moisturizer why is skin dry even after moisturizing common mistakes when applying moisturizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.