त्वचेला इन्स्टंट ग्लो मिळवा यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करत असतो. महागडे स्किन केअर, फेशियल आणि यांसारख्या अनेक प्रकारचे फेशियल केले जातात.(Ice water face wash) असाच एक प्रभावी फेशियल म्हणजे आइस वॉटर फेशियल. इन्स्टंट ग्लोसाठी चेहरा बर्फाच्या पाण्याने धुण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर सध्या जबरदस्त ट्रेंडमध्ये आहे. ‘आयस बाथ’, ‘आयस फेशियल’ किंवा सकाळी उठताच क्षणी बर्फाच्या थंड पाण्यात चेहरा बुडवणे.(Instant glow side effects) असं म्हटलं जातं की या फेशियलमुळे काही सेकंदात त्वचा टाईट होते, पोर्स लहान दिसतात आणि चेहरा फ्रेश वाटतो.(Face glow tips) पण लगेच मिळणाऱ्या परिणामांच्या मागे देखील अनेक दुष्परिणाम आहेत जे अनेकांना माहीत नाही. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, बर्फाच्या पाण्याचा अचानक आणि जास्त वापर त्वचेच्या नैसर्गिक संरक्षणावर थेट आघात करू शकतो.
त्वचारोगतज्ज्ञ इप्सिता जोहरी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला त्या म्हणतात बर्फाचे पाणी हे चेहऱ्यासाठी चांगले असते. त्वचेवरील सूज कमी करते. ज्यामुळे त्वचा फ्रेश दिसतो. बर्फाचे पाणी रक्ताभिसरण वाढवून आपल्या त्वचेला अधिक तेजस्वी करतो. तसेच मेकअपपूर्वी बर्फाच्या पाण्याची थेरपी केल्यास मेकअप अधिक काळ टिकतो. पण काही छोट्या चुका केल्यास आपल्याला पश्चातापाची वेळ येते.
डॉक्टर सांगतात बर्फाच्या पाण्यात जास्त वेळ चेहरा बुडवून ठेवल्याने आपल्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे चेहऱ्यावर कोरडेपणा, जळजळ किंवा रॅशेस येऊ शकतात. बर्फ थेट त्वचेवर लावल्यास आपल्याला थंड वाटू शकते. ज्यामुळे सर्दी-खोकला-ताप सारखे आजार होऊ शकतात. जर आपल्या चेहऱ्यावर मुरुमे, रॅशेस किंवा पुरळ असेल तर बर्फाचे पाणी जास्त त्रास देऊ शकते. अशावेळी बर्फाचे पाणी चेहऱ्यावर लावणे टाळा. बर्फाचे पाणी त्वचेला घट्ट करते पण यामुळे त्वचा कोरडी देखील करते. त्यासाठी मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे.
ही काळजी घ्या.
1. डॉक्टर सांगतात चेहरा बर्फाच्या पाण्यात बुडवताना तो फक्त १०-१५ सेकंदांसाठी ठेवा, म्हणजेच चेहरा फक्त १० ते १५ सेकंदांसाठी बर्फात ठेवा नंतर ब्रेक घ्या.
2. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर बर्फाऐवजी थंड पाणी वापरा.
3. बर्फाचे पाणी वापरल्यानंतर नेहमी मॉइश्चरायझर लावा ज्यामुळे त्वचा ओलसर राहील.
4. दिवसातून १ ते २ वेळा जास्त वेळाच बर्फाच्या पाण्याचा वापर करा. जास्त वेळा फेस डिप करू नका.
