सुंदर, गुलाबी आणि मऊसर ओठ प्रत्येकालाच हवेहवेसे वाटतात.(dark lips causes) पण अनेकदा कळत- नकळतपणे आपल्याकडून अशा काही चुका होतात. ज्यामुळे ओठ काळे पडतात, कोरडे होतात आणि त्यांचे नैसर्गिक सौंदर्य हरवते.(toothpaste and dark lips) यामागची कारणं शोधली तर धूम्रपान, सूर्यप्रकाश, डिहायड्रेशन ही काही ठरलेली कारणं आहेत. मात्र रोज सकाळी आपण नकळत करत असलेली एक चूकही या समस्येला जबाबदार असते – ती म्हणजे टूथपेस्टचा चुकीचा वापर.(why lips turn black)
सध्या बाजारात अनेक प्रकारच्या टूथपेस्ट मिळत आहे. पण कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला त्यात असणाऱ्या घटकांकडे लक्ष देता यायला हवे.(morning mistakes for lips) बाजारात उपलब्ध असलेल्या टूथपेस्टमध्ये अनेकदा फ्लोराईड, ब्लीचिंग एजंट्स, स्ट्रॉंग केमिकल्स आणि डिटर्जंटसारखे घटक असतात. हे दात स्वच्छ करण्यासाठी जरी प्रभावी असले तरी ओठांच्या नाजूक त्वचेसाठी हे घटक हानीकारक ठरतात.(lip darkening reasons) दात घासताना टूथपेस्टचा थोडासा भाग ओठांवर लागतो आणि तो व्यवस्थित धुतला गेला नाही तर हळूहळू ओठ काळसर पडू लागतात.
ओठ काळे का पडतात?
ओठ काळे पडण्याची समस्या खूप सामान्य आहे. ही समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकते. जसे की शरीरात मेलेनिनचे प्रमाण वाढणे, हार्मोनल बदल, शरीरात आवश्यक पोषक तत्व न मिळणे, सिगारेट आणि औषधांच्या अतिवापरामुळे ओठ काळे होऊ शकतात. पण सकाळच्या एका चुकीमुळे ओठांचा काळपटपणा अधिक वाढतो.
नाजूक भागाभोवतीची त्वचा काळी पडली, खाज सुटते? ४ उपाय - आठवड्याभरात काळपटपणा होईल दूर
खरंतर आपण सगळेच सकाळी टूथपेस्ट वापरतो. नियमितपणे दात घासल्याने तोंडात साचलेले बॅक्टेरिया निघून जाण्यास मदत होतात. पण नियमितपणे वापरली जाणारी टूथपेस्ट आपल्याला ओठांचे सौंदर्य घालवते. डॉ. माधुरी अग्रवाल म्हणतात, बाजारात अनेक प्रकारच्या टूथपेस्ट पाहायला मिळतात. यामध्ये अनेक प्रकारचे रसायने आहेत. याच्या रोजच्या वापरामुळे त्वचा कोरडी होते आणि ओठांवर काळेपणा येतो. त्यामुळए ओठांमध्ये जळजळ, भेगा आणि वेदना यांसारख्या समस्या वाढतात. ब्यूटी प्रॉडक्ट्समुळे ओठ आणखी काळे पडतात. यासाठी आपण लिप स्क्रबचा वापर करायला हवा. ज्यामुळे ओठ निरोगी राहातील. ओठांची काळजी घेण्यासाठी लिप सनस्क्रीनचा वापर करा. ज्यामुळे ओठ सुरक्षित राहू शकतात.