Lokmat Sakhi >Beauty > जास्त पोषणासाठी केसांना रात्रभर तेल लावून ठेवता? जाणून घ्या याबाबत काय सांगतात एक्सपर्ट!

जास्त पोषणासाठी केसांना रात्रभर तेल लावून ठेवता? जाणून घ्या याबाबत काय सांगतात एक्सपर्ट!

Put Oil In Hair Overnight : अनेकदा बघायला मिळतं की, जास्त फायदे मिळतील म्हणून अनेक महिला केसांना रात्रभर तेल लावून झोपतात. त्यांचा असा समज असतो की, असं केल्यानं केस अधिक मजबूत होतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:25 IST2025-01-17T10:25:07+5:302025-01-17T10:25:51+5:30

Put Oil In Hair Overnight : अनेकदा बघायला मिळतं की, जास्त फायदे मिळतील म्हणून अनेक महिला केसांना रात्रभर तेल लावून झोपतात. त्यांचा असा समज असतो की, असं केल्यानं केस अधिक मजबूत होतील.

Is oiling hair overnight good or bad? | जास्त पोषणासाठी केसांना रात्रभर तेल लावून ठेवता? जाणून घ्या याबाबत काय सांगतात एक्सपर्ट!

जास्त पोषणासाठी केसांना रात्रभर तेल लावून ठेवता? जाणून घ्या याबाबत काय सांगतात एक्सपर्ट!

Put Oil In Hair Overnight : केसांची काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त महिला केसांना नियमितपणे तेल लावतात. तेलानं केसांना पोषण मिळतं आणि केस लांब व मजबूत बनतात. पण अनेकदा बघायला मिळतं की, जास्त फायदे मिळतील म्हणून अनेक महिला केसांना रात्रभर तेल लावून झोपतात. त्यांचा असा समज असतो की, असं केल्यानं तेल डोक्याच्या त्वचेमध्ये चांगल्या प्रकारे मुरेल आणि केस मजबूत होतील. पण खरंच रात्रभर केसांना तेल लावून ठेवणं योग्य आहे का? चला जाणून घेऊ केसांना रात्रभर तेल लावून ठेवल्यानं काय होतं.

डोक्याच्या त्वचेची रोमछिद्रे बंद होतील

रात्रभर तेल डोक्याच्या त्वचेला लावून ठेवल्यानं डोक्याच्या त्वचेची रोमछिद्रे बंद होऊ शकतात. ज्यामुळे डॅंड्रफ, खाज आणि केसगळतीच्या समस्या वाढू शकते.

धूळ-माती जमा होण्याची भीती

तेलामध्ये चिकटपणा असतो, जो रात्रभर केसांना राहिल्यानं गादी, बेडशीट आणि उशीच्या कव्हरमधीळ धूळ केसांना चिकटते. अशात तुम्हाला फायदा मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं.

केस तुटण्याचा धोका

ओले किंवा तेल लावलेले केस कमजोर असतात, अशात रात्री झोपताना डोक्याच्या हालचालीमुळे केस सहजपणे तुटू शकतात. इतकंच नाही तर केसांना तेल लावून झोपल्यानं उशी आणि चादरीलाही लागतं. अशात त्यात बॅक्टेरिया आणि फंगस होऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

पिंपल्स आणि एक्ने

डोक्यावर तेल लावलं तर ते चेहऱ्यावरही उतरतं. अशात चेहऱ्याची रोमछिद्रे बंद होऊ शकतात. तसेच कपाळ आणि चेहऱ्यावर एक्ने व पिंपल्स होण्याचा धोका वाढतो. खासकरून ऑयली स्कीन असलेल्यांनी कधीही रात्रभर केसांना तेल लावून ठेवू नये.

नॅचरल ऑइल इम्बॅलन्स होतं

रात्रभर तेल केसांना लावून ठेवल्यास त्वचेमधील नॅचरल ऑइलचं बॅलन्स बिघडू शकतं. ज्यामुळे त्वचा आणखी जास्त ऑयली होऊ शकते. ऑयली त्वचेमुळे त्वचेसंबंधी इतरही समस्या वाढू शकतात.

एलर्जी आणि जळजळ

प्रत्येकाच्या त्वचेची क्वालिटी वेगवेगळी असते आणि त्यांनी त्यांच्या त्वचेच्या क्वालिटीनुसार तेलाची निवड करावी. जर तुम्ही असं केलं नाही तर काही तेलामुळे त्वचेवर जळजळ, खाज किंवा एलर्जी होऊ शकते.

श्वास घेण्यास समस्या

काही लोकांना तेलाच्या गंधानं एलर्जी होऊ शकते. खासकरून खोबऱ्याचं तेल आणि मोहरीचं तेल. जे केसांना लावल्यावर डोकेदुखी किंवा श्वास घेण्यास समस्या होऊ शकते.

केसांवर तेल कधी लावावं?

जर केसांना पोषण द्यायचं असेल आणि तेल लावायचं असेल, केस धुण्याच्या साधारण १ तास ते ३० मिनिटांआधी केसांना तेल लावा. त्वचेच्या प्रकारानुसार तेलाची निवड करा. 

केसांना तेल लावण्याची पद्धत

केसांना तेल लावण्याआधी हलकं कोमट करा आणि नंतर केसांवर हलक्या हातानं मालिश करत लावा. बोटांच्या मदतीनं डोक्याच्या त्वचेची मालिश करा. ५ ते १० मिनिटं मालिश करा. असं केल्यानं डोक्यातील ब्लड फ्लो वाढेल आणि केसांना पोषण मिळेल. त्यानंतर केस शाम्पूनं धुवा.
 

Web Title: Is oiling hair overnight good or bad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.