Join us

तुरटी त्वचेसाठी फायदेशीर म्हणून चेहऱ्याला लावाल तर पस्तावाल! पाहा कुणी तुरटी वापरु नये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2025 15:43 IST

Is alum suitable for all skin types : Know who should not use alum on Skin : Who should avoid using alum on Skin : Who should skip using fitkari on skin : तुरटी चेहऱ्याला लावण्याचे व्हिडिओ पाहून प्रयोग करण्यापूर्वी हे वाचा..

'तुरटी' पाणी स्वच्छ करण्यासोबतच त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील फार पूर्वीपासूनच फायदेशीर मानली जाते. त्वचेच्या अनेक समस्यांवर तुरटीचा इवलासा खडा म्हणजे जणू वरदानच...याचबरोबर, त्वचेसाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ब्यूटी प्रॉडक्ट्स (Know who should not use alum on Skin) व घरगुती उपायांमध्ये देखील हमखास तुरटीचा वापर (Is alum suitable for all skin types) केला जातो. तुरटीच्या वापराने त्वचेच्या अनेक समस्या अगदी चुटकीसरशी (Who should avoid using alum on Skin) कमी करता येतात. त्वचेसाठी तुरटी वापरणे फायदेशीर मानले जाते, कारण ती एक उत्तम अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल घटक आहे. मुरुम कमी करण्यापासून त्वचेला टवटवीत ठेवण्यापर्यंत तुरटीचे अनेक उपयोग आहेत(Who should skip using fitkari on skin).

त्वचेच्या अनेक समस्यांसाठी तुरटी हा नैसर्गिक आणि असरदार उपाय असला तरी देखील प्रत्येकासाठी तुरटीचा वापर सुरक्षित असेलच असं नाही. काहीवेळा त्वचेसाठी तुरटीच्या वापराने त्वचेला दाह, कोरडेपणा किंवा अ‍ॅलर्जी होऊ शकते. तुरटीचा वापर सर्वांसाठीच योग्य नसतो. काही विशिष्ट प्रकारच्या त्वचेसाठी किंवा परिस्थितीत तुरटीचा वापर करणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्वचेसाठी तुरटी वापरण्याचे फायदे जरी अनेक असले तरी कोणी ती वापरणे टाळावे, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. सुप्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर करत तुरटी फायदेशीर असली तरी ती कोणी वापरु नये याबद्दल अधिक माहिती सांगितली आहे. 

तज्ज्ञ काय म्हणतात ?

प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये ते सांगतात, "तुरटी सामान्यतः सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित मानली जाते, मात्र काही विशिष्ट त्वचा प्रकारांसाठी ती अधिक फायदेशीर ठरते." त्यामुळे तुरटीचा वापर करताना त्वचेचा प्रकार ओळखूनच ती कशी वापरावी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.  

केस अचानकच पांढरे व्हायला लागलेत? ‘हे’ घरगुती तेल ठरते असरदार, केसांचं पांढरं होणं ‌थांबवतं...

केमिकलवाली विकतची मेहेंदी कशाला, ‘या’ ३ पानांची पेस्ट देईल केसांना सुंदर रंग! शून्य साईड इफेक्ट...

कोणत्या प्रकारच्या त्वचेसाठी तुरटीचा वापर फायदेशीर ? 

डॉ. सलीम जैदी सांगतात, तुरटीमध्ये नैसर्गिक अ‍ॅस्ट्रिंजंट गुणधर्म असतात, जे त्वचा घट्ट करण्यास आणि अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांना तुरटीचा विशेष फायदा होतो. तुरटी फक्त त्वचेवरील मुरुमं कमी करत नाही, तर त्वचेवरील डाग देखील हलके करण्यास उपयुक्त ठरते.

कोणत्या प्रकारच्या त्वचेसाठी तुरटीचा वापर नुकसानदायक ? 

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, जर त्वचा आधीपासूनच खूप कोरडी असेल तर तुरटीचा वापर टाळावा. कारण यामध्ये असलेल्या ड्रायिंग प्रॉपर्टीमुळे त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. ज्यामुळे खाज, जळजळ किंवा रॅशेससारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे, जर आपल्याला एक्झिमा, सोरायसिस किंवा त्वचा अतिशय संवेदनशील असेल तरीही तुरटीचा वापर करणे टाळावे. यामुळे त्वचेची स्थिती आणखीनच बिघडू शकते.

अथिया शेट्टी केसांना लावते तिच्या आईने तयार केलेलं हे पारंपरिक तेल! म्हणून तिचे केस दाट-लांबसडक...

त्वचेसाठी तुरटीचा योग्य वापर कसा करावा ?

जर तुमची त्वचा ऑयली असेल, तर तुम्ही तुरटी पाण्यात भिजवून त्याचा पेस्ट तयार करून आठवड्यातून १ ते २ वेळा चेहऱ्यावर लावू शकता. ही पेस्ट चेहऱ्यावर ५ ते १० मिनिटं ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचा आतून साफ, टाईट आणि फ्रेश वाटते. डॉ. सलीम जैदी यांच्या मते, तुरटी हा त्वचेसाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे, पण त्याचा वापर काळजीपूर्वक करायला हवा. तेलकट त्वचेसाठी ती वरदान ठरते, मात्र कोरडी किंवा संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी तुरटीचा वापर जरा जपूनच करावा. कोणताही नवीन उपाय सुरू करण्याआधी त्वचेवर पॅच टेस्ट करून पहा किंवा स्किन एक्सपर्टचा सल्ला घ्या.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय