केस गळणं, केस विरळ होणं या समस्या आजकाल प्रत्येकालाच उद्भवतात. केसांच्या या समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. चिंचेचा वापर स्वंयपाकात अनेकदा केला जातो. याच चिचेंचा वापर केसांवर करून तुम्ही दाट, लांबसडक केस मिळवू सकता. जर तुम्ही मध्यप्रदेशातील मांडू या ठिकाणी गेला असाल तर तुम्ही गोरखचिंचाचे वृक्ष नक्कीच पाहिले असतील. (Tamarind For Hair Growth How To Use baobab Oil For Hair Growth)
या झाडाला येणाऱ्या चिंचाला विशेष महत्व असते. गोरखचिंचेच्या झाडाला येणारी चिंच ही मोठ्या शेंगेप्रमाणे दिसते. हे फळ अनेक औषधी गुणांचा भंडार आहे. म्हणूनच आफ्रिकेत या झाडाला ट्रि ऑफ लाईफ असं म्हटलं जातं. गोरखचिंचाची फळं, पानं,साल यात हिलिंग पॉवर चांगली असते. भारतात बऱ्याच कमी लोकांना या झाडाच्या फायद्यांबाबत माहिती आहे.
या झाडाला व्हिटामीन सी आणि एंटी ऑक्सिडेंट्सचे भंडार म्हटलं जाते. व्हिटामीन सी साठी ओळखल्या जाणाऱ्या संत्रीपेक्षा जास्त व्हिटामीन सी यात असते. हे एक इम्यूनिटी बुस्टरप्रमाणे काम करते याशिवाय त्वचेलाही बरेच फायदे देते. गोरखचिंचेच्या बियांपासून तयार केले जाणारे तेल केसांची वाढ चांगली करण्यास मदत करते. केसांसाठी ही चिंच कशी फायदेशीर ठरतात समजून घेऊ. (Ref) गोरखचिंचेला कोल्ड प्रेस करून हे तेल बनवले जाते. हे तेल हलके असते आणि स्काल्पमध्ये सहज शोषून घेतले जाते. यात व्हिटामीन ए, डी, एफ असते. ज्यामुळ हेअर डॅमेज कमी होते. हेअर फॉलिकल्स रिपेअर करून केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते. यात गुड फॅट ओमेगा ३, ६ आणि ९ असते. ज्यामुळे केस तुटण्याची समस्या टाळता येते. यातील एंटी ऑक्सिडेंट्स स्काल्पला हेल्दी ठेवतात. याचे तेल स्काल्पमध्ये सहज शोषले जाते. ज्यामुळे केसांची मुळं मजबूत होण्यास मदत होते.
गोरखचिंचेचा वापर कसा करायचा? (How To Use baobab Oil For Hair Growth)
दुसरी पद्धत अशी की गोरखचिंचेचे ४ थेंब तेल, रोजमेरी ऑईल २ थेंब मिक्स करून आठवड्यातून २ वेळा स्काल्पवर व्यवस्थित मसाज करा. शॅम्पू करण्याआधी कंडिशनिंगसाठी या तेलानं कोटींग करा. हेअर मास्क तयार करण्यासाठी दोन चमचे एलोवेरा तेलासोबत या तेलानं मसाज करा. अर्धा ते एक तास थांबून नंतर केस स्वच्छ धुवून टाका.