Lokmat Sakhi >Beauty > चबी चिक्स आणि गोलाकार चेहरा असेल तर लक्षात ठेवा या ४ टिप्स, रोजच दिसाल सुंदर..

चबी चिक्स आणि गोलाकार चेहरा असेल तर लक्षात ठेवा या ४ टिप्स, रोजच दिसाल सुंदर..

If you have chubby cheeks and a round face, remember these 4 tips, you will look beautiful every day : गुबगुबीत गाल आणि गोल चेहरा असेल तर पाहा काय करावे. रोज दिसा सुंदर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2025 17:24 IST2025-09-23T17:18:41+5:302025-09-23T17:24:10+5:30

If you have chubby cheeks and a round face, remember these 4 tips, you will look beautiful every day : गुबगुबीत गाल आणि गोल चेहरा असेल तर पाहा काय करावे. रोज दिसा सुंदर.

If you have chubby cheeks and a round face, remember these 4 tips, you will look beautiful every day | चबी चिक्स आणि गोलाकार चेहरा असेल तर लक्षात ठेवा या ४ टिप्स, रोजच दिसाल सुंदर..

चबी चिक्स आणि गोलाकार चेहरा असेल तर लक्षात ठेवा या ४ टिप्स, रोजच दिसाल सुंदर..

प्रत्येकाचा चेहरा, चेहर्‍याची ठेवण, केस, शरीराचा आकार वेगळा असतो. काहींचा चेहरा गोल असतो, तर काहींचा चेहरा उभट असतो. एवढेच नाही तर इतरही अनेक प्रकारे चेहर्‍याचा आकार वेगळा असतो. त्वचेचा रंग, पोत तसेच चेहर्‍याचा आकार यानुसार कोणाला कोणते कपडे सुट करतील आणि कसा मेकअप सुट करेल यातही वेगळेपणा असतो. त्यानुसार स्टाईलिंग करणे नक्कीच फायद्याचे ठरते. (If you have chubby cheeks and a round face, remember these 4 tips, you will look beautiful every day)अपिरियन्स जास्त उठावदार वाटतो. तसेच व्यक्तिमत्व जास्त उठून दिसते. काहींच्या चेहर्‍याचा आकार गोल असतो. चबी गाल आसणाऱ्यांनी कपडे निवडताना आणि मेकअप करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. ज्याचा नक्कीच फायदा होईल.  चेहर्‍याचा गोल आकार लपवण्याची काहीच गरज नाही. मात्र त्याला सुट होईल अशी स्टाइल करणे नक्कीच फायद्याचे ठरले. 


 
१. गोलाकार चेहर्‍यावर हेअरस्टाइलचा जास्त प्रभाव पडतो. जर तुमचा चेहरा गोल आहे तर केस वर बांधणे टाळा. बन बांधण्याऐवजी केस बाजूला सुटे सोडणे जास्त सुंदर दिसेल. तसेच केस बांधताना मानेजवळ बांधा. फार सुंदर दिसते. केस घट्ट आणि वरच बांधायला आवडत असतील तर मग हायपोनी बांधा. चेहरा नक्कीच खुलून दिसेल. 

२. व्ही नेक, यू नेक, एल्बो लेन्थ आणि स्विटहार्ट कट असलेले कपडे वापरा. एकदम मस्त दिसतील. चबी असल्यावर अगदी गळाबंद काही घालायची गरज नसते. उलट चेहरा छान दिसावा यासाठी जरा डिपनेक कपडे घालून पाहा. गळाबंदच आवडत असेल तर मग बोटनेक वापरुन पाहा. शेवटी प्रत्येकाही आवड वेगळी असते. पण अनेक शिक्षित स्टाइलिश हेच सांगतात की ड्रेसचा गळा आणि चेहऱ्याचा लूक यांचा थेट संबंध असतो.

३. ओढणी घेतल्यावर अचानक जाड दिसायला होते? ओढणी घेण्याची चुकीची पद्धत असेल तर चेहरा आणि शरीर जास्त जाड दिसते. खांद्यावरुन ओढणी घेण्याची सवय अनेकांना असते. मात्र जर चेहरा गोलाकार असेल तर ओढणी एका बाजूला घ्यायची. वन साइड दुपट्टा मस्त दिसतो. तसेच चेहरा खुलून दिसतो.  एकदा ही टिप नक्की करुन पाहा. 

४. चष्मा आणि गॉगल कोणता वापरता यावर तर चेहर्‍याचा आकार फारच निर्भर असतो. गोलाकार आणि मोठा चौकोनी चष्मा वापरत असाल  तर चेहरा जास्तच मोठा आणि गोलाकार दिसेल. त्यामुळे  कॅटआय तसेच जोमॅट्रिक फ्रेम्स वापरुन पाहा. गोल चष्मा वापरणे नक्कीच टाळा. त्यामुळे चेहरा जरा विचित्र दिसू शकतो. या काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा आणि रोजच सुंदर दिसा.   

Web Title: If you have chubby cheeks and a round face, remember these 4 tips, you will look beautiful every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.