सध्याच्या धावपळीच्या जगात महिलांना स्वत:साठी वेळ मिळत नाही.(Wet wipes skin damage) लांबचा प्रवास असला की त्या स्वत:ची आवड-निवड त्या वेळी जपतात.(Makeup removal mistakes) आपण अनेक महिलांना प्रवासात केस विंचरताना, मेकअप करताना पाहिलं असेलच.( Wrinkles from wet wipes) चेहरा स्वच्छ करण्यासाठी त्या वेट वाइप्सचा वापर करतात.(Dry skin remedies) सध्या वेट वाइप्स हा प्रत्येक महिलेच्या पर्समधील आवश्यक वस्तू. (How to remove makeup safely) ऑफिसमध्ये, प्रवासात किंवा घाईत मेकअप काढायचा असेल तर त्या सहज वेट वाइप्सचा वापर करतात. त्याचा वापर करुन सहज त्वचा स्वच्छ केली जाते. पण या सवयीमुळे आपल्या त्वचेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.(Wet wipes side effects)
अनेकांना चेहरा धुण्याचा वैताग देखील येतो. त्यामुळे झोपण्याआधी वेट वाइप्सने चेहरा पुसतात. पण असं केल्याने त्वचा खराब होऊ शकते. तज्ज्ञ म्हणतात, वेट वाइप्स वापरण्यासाठी सोपे आहे पण ते आपल्याला त्वचेला नुकसान पोहचवू शकते. वाइप्स आपल्या त्वचेचे पीएच सुंतलन बिघडवतात. ज्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते. ज्यामुळे जळजळ आणि खाज सुटू शकते.
ओव्हर साईज शर्ट घालताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, दिशा पटणी-दीपिका पादूकोणसारखा परफेक्ट लूक
वाईप्समुळे वरच्यावर मेकअप निघतो. पण मेकअपचे काही कण हे आपल्या त्वचेवर चिकटून राहतात. यामुळे ओपन पोअर्स बंद होऊन मुरुमे येण्याची शक्यता वाढते. पिंपल्स देखील येतात. अनेक वेट वाईप्समुळे अल्कोहोल, सुगंधी द्रव्य आणि संरक्षक घटक असतात. जे त्वचेला कोरडे करतात. पण संवेदनशील त्वचेच्या लोकांना जळजळ होणे, त्वचेला खाज सुटणे किंवा पुरळ येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.
मेकअप केल्यानंतर तो काढण्यासाठी वाईप्सऐवजी आपण सौम्य क्लींजर, मायलेसर वॉटर किंवा क्लींजिंग बाम वापरायला हवं. इतकंच नाही तर आपण नारळाच्या तेलाचा देखील वापर करु शकतो. यासाठी त्वचेवर नारळाचे तेल लावून चेहरा हलक्या हाताने चोळा. मग कापडाने पुसा. त्यानंतर फेस वॉश त्वचा स्वच्छ करा. चेहरा नीट स्वच्छ केल्यास मेकअपही निघेल आणि मुरुमेही येणार नाही.
