आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही सकाळच्या चहाने होते. सकाळचा गरमागरम चहा प्यायल्याशिवाय दिवस सुरुच होत नाही असं अनेकांच म्हणणं असतं.(used tea leaves benefits) अनेकांना चहा वारंवार पिण्याची सवय असते.(tea waste uses) त्यामुळे दिवसभर ते चहा गरम करत असतात. निरुपयोगी समजली जाणारी चहापत्ती आपण कचऱ्यात फेकून देतो. (tea leaves for glowing skin)
चहापत्तीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, टॅनिन्स आणि नैसर्गिक तेल असते.(tea leaves for glowing skin) जे त्वचा, केस आणि घरासाठीही अंत्यत उपयोगी ठरतात.(natural skincare home remedies) जर आपण चहापत्तीचा योग्य पद्धतीने वापरली तर ती नैसर्गिक स्किन केअर आणि होम केअर प्रॉडक्ट बनू शकते.(green tea beauty hacks) चहापत्तीचा वापर कसा करायचा पाहूया.
उरलेली चहापत्तीपासून आपण नैसर्गिक सेंद्रिय खत बनवू शकतो. याला आपण वाळवून शकतो किंवा थेट मातीत घालू शकता. त्यात असलेले पोषक घटक मातीची सुपीकता वाढवतात. आणि वनस्पतींना बळकटी देतात. चहापत्ती टॅनिन आणि अँटीऑक्सि़ंट्स घाण आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. उरलेल्या चहाच्या पानांमध्ये थोडे मध किंवा दह्याचे मिश्रण करुन स्क्रब तयार करता येतो. हे आपल्या चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा रंग सुधारतो.
वापरलेल्या चहापत्तीने केस धुतल्यास फायदा होता. हे केसांना नैसर्गिक पद्धतीने चमक देते. उरलेली चहा पावडरमध्ये मेहेंदी किंवा अंड्यामध्ये मिसळून हेअर मास्क बनवा. यामुळे केस मऊ, मजबूत राहण्यास मदत होईल. तसेच केसगळती रोखण्यास मदत होते. थंड झालेल्या टी बॅग्ज डोळ्यांवर १० मिनिटे ठेवल्यास सूज आणि थकवा कमी होईल. यात असणारे कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांना शांत करतात.
उरलेली चहापत्ती पुन्हा उकळवून आपण सौम्य पाचक चहा बनवू शकतो. यात थोडे आले, पुदिना आणि लिंबाचा रस घाला. यामुळे केवळ चव वाढेल असे नाही पण पचनसंस्था सुरळीत होण्यात मदत होईल. चहापत्तीने आपण भांडी किंवा जमीन देखील साफ करता येईल.