Lokmat Sakhi >Beauty > केस नॅचरली काळेभोर-मुलायम करते त्रिफळा पावडर, एकदा लावा अनेक महिने दिसणार नाहीत पांढरे केस

केस नॅचरली काळेभोर-मुलायम करते त्रिफळा पावडर, एकदा लावा अनेक महिने दिसणार नाहीत पांढरे केस

Ayurvedic Hair Color : केस वेळेआधीच पांढरे होणं टाळायचं असेल किंवा केसांना नॅचरल काळा रंग द्यायचा असेल तर त्रिफळा पावडर खूप बेस्ट ठरू शकतं. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 15:29 IST2025-07-10T14:45:01+5:302025-07-10T15:29:05+5:30

Ayurvedic Hair Color : केस वेळेआधीच पांढरे होणं टाळायचं असेल किंवा केसांना नॅचरल काळा रंग द्यायचा असेल तर त्रिफळा पावडर खूप बेस्ट ठरू शकतं. 

How to use triphala for coloring white hair | केस नॅचरली काळेभोर-मुलायम करते त्रिफळा पावडर, एकदा लावा अनेक महिने दिसणार नाहीत पांढरे केस

केस नॅचरली काळेभोर-मुलायम करते त्रिफळा पावडर, एकदा लावा अनेक महिने दिसणार नाहीत पांढरे केस

Ayurvedic Hair Color : सौंदर्याचा विषय निघाला तर केसांची निगा राखणं हे महिलांचं सगळ्यात महत्वाचं काम असतं. लांब, दाट, काळे आणि चमकदार केस सगळ्यांनाच हवे असतात. पण बदलती लाइफस्टाईल, पोषणाची कमतरता, प्रदूषण, केसांची योग्य काळजी घेणं या गोष्टींमुळे केस गळतात, कमी वयात पांढरे होता. कमी वयात केस पांढरे झाल्यानं तर जास्तीत जास्त लोक चिंतेत आहेत. मग केसांवर कलर लावतात किंवा केमिकल्सचा वापर करतात. ज्यामुळे केसांचं आणखी जास्त नुकसान होतं. अशात केस वेळेआधीच पांढरे होणं टाळायचं असेल किंवा केसांना नॅचरल काळा रंग द्यायचा असेल तर त्रिफळा पावडर खूप बेस्ट ठरू शकतं. 

त्रिफळा काय आहे?

आयुर्वेदात तीन महत्वाच्या जडीबुटी आवळा, हिरडा आणि बेहडा यांच्या मिक्षणाला त्रिपळा असं म्हणतात. त्रिफळा इम्यून सिस्टीम, पचन तंत्र, त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो.

केसांसाठी त्रिफळा

केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही त्रिफळा पावडरचा हेअर पॅक आणि हेअर मास्क बनवू शकता. यानं तुमचे केस नॅचरली काळे, मुलायम आणि चमकदार होतील. 

त्रिफळाचा हेअर मास्क कसा बनवाल?

३ चमचे ऑलिव्ह ऑइल घ्या आणि त्यात ४ चमचे त्रिफळा पावडर टाका. त्यात अंड्याचा पिवळा भाग टाका आणि या गोष्टी चांगल्या मिक्स करा. हेअर मास्क तयार आहे. आता त्रिफळा हेअर मास्क लावण्याआधी केसांना शाम्पू करा आणि केस पाण्याने ओले करा. त्यानंतर केसांवर हेअर मास्क लावा.

हा हेअर मास्क ३० ते ४५ मिनिटांसाठी केसांवर तसाच लावून ठेवा. नंतर साध्या पाण्यानं केस धुवा. त्यानंतर पुन्हा एकदा माइल्ड शाम्पू केस धुवा. 

Web Title: How to use triphala for coloring white hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.