Join us

पांढरे केस काळे करण्यासाठी डाय लावणं सोडा, फक्त चहा पावडरमध्ये टाकून लावा 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 11:10 IST

Black Hair Home Remedies : अनेकांना हे माहीत नसतं की, ते केस काळे करण्यासाठी नॅचरल उपायही करू शकतात. असाच एक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Black Hair Home Remedies : आजकाल पोषणाची कमतरता, वेळेवर न झोपणे, टीव्ही-फोन जास्त जास्त बघणे, फास्ट फूड जास्त खाणे, तेलकट जास्त खाणे यामुळे कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या अधिक वाढत आहे. केस पांढरे झाल्यावर ते काळे करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्सचा अधिक वापर केला जातो. यांनी केस काही वेळासाठी काळे होतात, पण केसांचं नुकसानही होतं. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, ते केस काळे करण्यासाठी नॅचरल उपायही करू शकतात. असाच एक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चहा पावडर केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्वचेसंबंधी अनेक उपायांसाठी ते वापरलं जातं. याच चहा पावडरमध्ये एक गोष्ट मिक्स करून केसांवर लावली तर पांढरे केस काळे करण्यास मदत मिळू शकते. जाणून घेऊ कसा करायचा उपाय...

केस काळे करण्याचा उपाय

केस काळे करण्याचा हा उपाय करण्यासाठी १ लिटर पाणी, १० चमचे चहा पावडर किंवा टी बॅग लागतील. एका भांड्यात पाणी टाका. ते उकडण्यासाठी ठेवा. नंतर त्यात चहा पावडर घाला. आता गॅसची आस मध्यम ठेवा आणि पाणी चांगलं उकडू द्या. गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्या. नंतर एका हेअर ब्रशच्या मदतीने हे पाणी केसांसोबत केसांच्या मुळात लावा. हे पाणी आंघोळीच्या ३० मिनिटांआधी लावा. नंतर कोमट पाण्याने केस धुवावे.

दुसरी पद्धत

१ लीटर पाणी, १० चमचे चहा पावडर, ६ चमचे कॉफी घ्या. एका भांड्यात पाणी आणि चहा पावडर टाका. ते चांगलं उकडू द्या आणि नंतर त्यात कॉफी पावडर मिश्रित करा. नंतर पाणी थंड होऊ द्या आणि गाळून घ्या. हे पाणी केसांना लावा आणि ३० मिनिटांची केस धुवावे.

किती दिवसात दिसेल फरक?

केस काळे करण्याची ही पद्धत परमनन्ट नाही. पण मार्केटमध्ये मिळत असलेल्या केमिकलयुक्त डायपेक्षा हा उपाय नक्कीच चांगला आहे. केस चमकदार आणि काळे ठेवण्यासाठी आठवड्यातून तीनदा हा उपाय केला तर फायदा होईल.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स